Join us

कंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 19:23 IST

अभिनेत्री कंंगना राणौत पुन्हा एका नव्या वादात अडकली आहे. होय,कंगना, तिची बहीण रंगोली आणि तिची टीम यांच्याविरोधात एका प्रॉपर्टी डीलरने खार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

अभिनेत्री कंंगना राणौत पुन्हा एका नव्या वादात अडकली आहे. होय,कंगना, तिची बहीण रंगोली आणि तिची टीम यांच्याविरोधात एका प्रॉपर्टी डीलरने खार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. यानंतर खार पोलिसांनी कंगनाला समन्स बजावल्याचे कळते.प्रकाश रोहिरा असं या प्रॉपर्टी डिलरचे नाव असून, जुलै महिन्याच्या अखेरीस त्याने कंगनाविरोधात तक्रार दाखल केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंगनाने मुंबईतील पाली हिल येथे तीन हजारांवर स्क्वेअर फुटची एक प्रॉपर्टी खरेदी केली. यासाठी कंगनाने १ कोटी ३ लाख रूपयांची स्टँम्प ड्युटी भरली. नियमानुसार, या खरेदी व्यवहारावेळी कंगनाने प्रॉपर्टी डिलरला १ टक्का कमिशन दिले होते. ही रक्कम जवळपास २२ लाख रूपये होती. पण आता प्रॉपर्टी डीलरने २ टक्के कमिशनची मागणी केली आहे. प्रॉपर्टी डिलरला ठरलेल्या रकमेनुसार एक टक्के म्हणजेच जवळपास २१ लाख रुपये देण्यात आले आहेत, पण आता तो २ टक्के कमिशन मागतो आहे, असे कंगनाच्या टीमने स्पष्ट केले आहे.   आता या सर्व प्रकरणाला पुढे कोणतं वळण मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  गेल्या काही वर्षांत कंगनाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक भक्कम स्थान निर्माण केले आहे. रिअल लाईफमध्ये कंगना कितीही वादग्रस्त ठरो. पण बॉक्सआॅफिसवर तिचे चित्रपट गर्दी खेचण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे दरवेळी प्रेक्षकांसाठी काही हटके घेऊन येण्याचा कंगनाचा प्रयत्न असतो. लवकरच कंगनाचा ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांशी’हा पीरियड ड्रामा रिलीज होतोय. यानंतर ती ‘मेंटल है क्या’ या चित्रपटातही कंगना दिसणार आहे. 

 

टॅग्स :कंगना राणौत