आपल्या परखड वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारी कंगना राणौत आता ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांच्यावर बरसली आहे. होय, एका पत्रकार परिषदेत, ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांच्यावर भडकली. निर्भयाच्या आईने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे अनुकरण करून दोषींना माफ करावे, असा अजब सल्ला ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईला दिला होता. या पार्श्वभूमीवर कंगनाला पत्रकार परिषदेत यावरचे तिचे मत विचारण्यात आले आणि कंगना भडकली.
या आरोपींना शिक्षा देण्यासाठी केल्या जाणा-या विलंबावरही तिने नाराजी व्यक्त केली. अशा लोकांना सर्वांसमोर फाशी द्यायला हवी म्हणजे इतरांना त्यातून कायद्याचा धाक निर्माण होईल. निर्भयाचे आई-वडील इतक्या वर्षांपासून आपल्या मुलीला गमावल्याचे दु:ख सहन करत आहे. अशात या दोषींना शांतपणे मारण्याचा काय फायदा. आपण अशाप्रकारे आरोपींना मारुन कोणतेही उदाहरण सेट करु शकत नाही. त्यामुळे या दोषींना भरचौकात फासावर चढवायला हवे, असेही ती म्हणाली.दिल्लीच्या पटियाला हाउस कोर्टाने निर्भया रेप केसमधील दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील दोषींना 1 फेब्रुवारीला पहाटे 6 वाजता फाशी दिली जाणार आहे.कंगना सध्या ‘पंगा’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.