Join us

कंगना राणौतचे वाढले भाव, ‘मेंटल है क्या’च्या निर्मात्यांपुढे ठेवली इतकी मोठी अट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 7:44 AM

कंगणा राणौत बॉलिवूडची एक अशी अभिनेत्री आहे, जी आपल्या अटींवर काम करते. तिच्या चित्रपटात ती स्वत: ‘हिरो’ असते. 

कंगणा राणौत बॉलिवूडची एक अशी अभिनेत्री आहे, जी आपल्या अटींवर काम करते. तिच्या चित्रपटात ती स्वत: ‘हिरो’ असते. गेल्या काही वर्षांत कंगनाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक भक्कम स्थान निर्माण केले आहे. रिअल लाईफमध्ये कंगना कितीही वादग्रस्त ठरो. पण बॉक्सआॅफिसवर तिचे चित्रपट गर्दी खेचण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे दरवेळी प्रेक्षकांसाठी काही हटके घेऊन येण्याचा कंगनाचा प्रयत्न असतो. लवकरच कंगनाचा ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांशी’ हा पीरियड ड्रामा रिलीज होतोय. यानंतर ती ‘मेंटल है क्या’ या चित्रपटातही कंगना दिसणार आहे. 

सूत्रांचे मानाल तर या दोन चित्रपटांबद्दल कंगना इतकी आश्वस्त आहे की, ‘मेंटल है क्या’च्या निर्मात्यांसमोर तिने एक वेगळीच अट ठेवली आहे. होय,कंगनाने या चित्रपटाच्या नफ्यातील वाटा मागितला आहे. यापूर्वीचे कंगनाचे काही चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकले नाहीत. त्यामुळे ‘मेंटल है क्या’चे निर्माते जरा साशंक आहेत. आता निर्माते कंगनापुढे झुकतात की कंगना मागे हटते, ते बघूच.

मुळात कंगना राणौत तिचे मानधन सिनेमाच्या  बजेटनुसार  ठरवत असते. 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचे मेकिंग बजेट 120 कोटींपेक्षा जास्त आहे. तेव्हाच 'मणिकर्णिका'साठी कंगनाने जवळपास 10 कोटी रुपये घेतले असून अभिनेत्रींमध्ये सगळ्यांत जास्त मानधन घेणा-या अभिनेत्रींच्या यादीत आता कंगनाचे नाव सामिल झाले आहे.

 

टॅग्स :कंगना राणौत