Kangana Ranaut Birthday Special : बॉलिवूडमध्ये संधी मिळाली नसती तर पॉर्नस्टार बनले असते सांगतेय कंगना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 01:36 PM2019-03-23T13:36:37+5:302019-03-23T13:37:28+5:30
कंगना आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. पण कंगनाला यश सहजासहजी मिळालेले नाहीये.
कंगना राणौतचा आज वाढदिवस असून २३ मार्च १९८७ रोजी हिमाचल प्रदेशमधील मनालीजवळील एका छोट्याशा गावात कंगनाचा जन्म झाला. बालपणी कंगनाचा ग्लॅमर दुनियेशी कोणताच संबंध नव्हता. कंगनाचे वडील अमरदीप व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आई आशा शिक्षिका आहे. कंगनाचे बालपण डेहरादूनमध्ये गेले. तेथेच डीएव्ही हायस्कूलमधून कंगनाने आपले शिक्षण पूर्ण केले.
कंगना आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. पण कंगनाला यश सहजासहजी मिळालेले नाहीये. कंगनाने डॉक्टर बनावे अशी तिच्या कुटुंबियांची इच्छा होती. पण तिला त्यात रस नव्हता आणि त्यामुळे ती घर सोडून दिल्लीला राहायला आली आणि तिने मॉडलिंगच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर दिग्दर्शक अरविंद गौर यांच्याकडे अभिनयाचे धडे गिरवले. दिल्लीत असताना रंगमंचावर अभिनय करण्याची तिला संधी मिळाली आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये काम शोधण्यासाठी ती मुंबईत आली. अभिनयक्षेत्रात करियर करण्याचा कंगनाचा निर्णय तिच्या कुटुंबियांना मान्य नव्हता. त्यामुळे कंगना स्वबळावर मुंबईत काम शोधत होती.
Vh1 Inside Access या टीव्ही शोला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने सांगितले होते की, हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा भाग बनण्याअगोदर मी एक अॅडल्ट फिल्म साइन केली होती. मला या चित्रपटासाठी फोटोशूट करायचे होते. परंतु जेव्हा मी त्याठिकाणी पोहोचली तेव्हा मला सगळ्या गोष्टी खूपच विचित्र वाटल्या. या गोष्टी चुकीच्या असल्याचे मला जाणवत होते. पण माझ्याकडे काम नसल्याने हे करूया असे मी ठरवले होते. अनुराग बासूने जर मला ‘गँगस्टर’या चित्रपटात भूमिका दिली नसती तर आज मी कदाचित पोर्न इंडस्ट्रीत असती. या चित्रपटासाठी मला बरेच आॅडिशन्स द्यावे लागले. तसेच मला कित्येक महिने प्रतीक्षा करावी लागली. परंतु चित्रपट मिळाल्यानंतर जणू काही माझ्या करिअरची दिशाच बदलली. त्यानंतर मी या इंडस्ट्रीपासून दूर राहणे पसंत केले. या चित्रपटानंतर मी माझ्या अभिनयावर खूप मेहनत घेतली. पुढे एकापेक्षा एक चॅलेंजिंग अशा भूमिका साकारल्या.