Join us

‘पंगा गर्ल’ कंगनाचा मोठा निर्णय, नावातून हटवलं ‘राणौत!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 6:20 PM

बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ कंगना राणौत चर्चेत असते ती तिच्या परखड वक्तव्यांमुळे. सध्या ती चर्चेत आहे ती ‘थलायवी’ या तिच्या आगामी सिनेमामुळे.

ठळक मुद्दे‘थलायवी’ या चित्रपटाच्या निमित्ताने   कंगनाने महाराष्ट्र सरकारला राज्यातील चित्रपटगृहे उघडण्याची विनंती केली आहे

बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ कंगना राणौत (Kangana Ranaut) चर्चेत असते ती तिच्या परखड वक्तव्यांमुळे. सध्या ती चर्चेत आहे ती ‘थलायवी’ (Thalaivii)  या तिच्या आगामी सिनेमामुळे. होय, माजी मुख्यमंत्री दिवंगत जे जयललिता यांच्या आयुष्यावर बेतलेला कंगनाचा हा सिनेमा येत्या शुक्रवारी रिलीज होतोय. सध्या कंगना याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. कालपरवा कंगनाने जयललिता यांच्या समाधीवर जाऊन त्यांचा आशीर्वाद घेत चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कंगनाने प्रमोशनचा धडाका लावला आहे. होय, अगदी त्यासाठी स्वत:चे नाव बदलत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

 कंगनाने आपल्या इन्स्टाग्रामवरील नावात बदल करत, कंगना राणौतच्या जागी कंगना थलायवी लिहिले आहे. ‘थलायवी’ या सिनेमाच्या निमित्ताने ला जे. जयललिता यांच्या जीवनप्रवास जवळून अनुभवता आला. जयललिता यांचा माझ्यावर मोठा प्रभाव झाला आहे, असं कंगना अलीकडे म्हणाली होती. राणौत हे आडनाव बदलून त्याजागी ‘थलायवी’ हा बदल याचाच परिणाम आहे. ‘थलायवी’ हा सिनेमा येत्या 10 सप्टेंबरला जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. हिंदी, तमिळ,तेलुगु अशा विविध भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. थलायवी या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौत हिने जयललिता यांची भूमिका साकारली आहे. तर दाक्षिणात्य अभिनेता अरविंद स्वामी एम.जी.रामचंद्रन यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ए.एल.विजय यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

 महाराष्ट्र सरकारला हात जोडून केली  विनंती‘थलायवी’ या चित्रपटाच्या निमित्ताने   कंगनाने महाराष्ट्र सरकारला राज्यातील चित्रपटगृहे उघडण्याची विनंती केली आहे. ‘महाराष्ट्रातील करोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील सिनेमागृहे सुरु करून चित्रपटसृष्टी आणि चित्रपट उद्योगांना उभारी द्यावी, ही महाराष्ट्र सरकारला विनंती,’ असे  इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहून कंगनाने त्याखाली हात जोडणारे ईमोजी टाकले आहेत. हिंदी मल्टिप्लेक्सने ‘थलायवी’ हा चित्रपट दाखवावा अशी इंस्टाग्राम स्टोरीदेखील कंगनाने टाकली आहे. 

टॅग्स :कंगना राणौत