अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अखेर जो बायडन यांनी बाजी मारली असून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. त्यामुळे, लवकरच जो बायडन हे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसमध्ये पाऊल ठेवतील. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत, डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडन राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचले. त्यांची निवड होताच जगभरातील नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही जो यांचे अभिनंदन केले. अपवाद फक्त कंगना राणौत हिचा. होय, जो बायडन यांना ‘गजनी’ असा उल्लेख करत, कंगनाने लगेच एक ट्विट केले. तिचे हे ट्विट सध्या व्हायरल होतेय.
जो बायडन यांच्या विजयाची खिल्ली उडवत, तिने लिहिले, ‘गजनी बायडन यांच्याबद्दल मी पूर्णपणे आश्वस्त नाही. ज्यांचा डाटा प्रत्येक 5 मिनिटाला क्रॅश होतो. इतक्या औषधांचे इंजेक्शन त्यांच्यात इंजेक्ट केले गेलेत की, ते एक वर्षांपेक्षा अधिक काळ टिकू शकणार नाहीत. त्यामुळे कमला हॅरीस याच शो पुढे नेतील, हे स्पष्ट आहे. जेव्हा एक महिला पुढे जाते, तेव्हा आपल्यासोबत ती अन्य महिलांसाठीही मार्ग तयार करते. या ऐतिहासिक दिवसासाठी चीअर्स.’
बायडन यांना ‘गजनी’ म्हणणे आणि त्यांचा डाटा क्रॅश होतो असे म्हणत कंगनाने बायडन यांच्या स्मरणशक्तीवर प्रहार केला आहे. ‘गजनी’ या सिनेमात आमिरला ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस’ असल्याचे दाखवले होते. कंगनाच्या मते, बायडन हे सुद्धा विसरळभोळे आहेत. कंगनाच्या या ट्विटवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे बायडन यांच्या विजयावर ती खूश नाही. अर्थात अमेरिकन उपराष्ट्रपती निवड झालेल्या कमला हॅरीस यांच्या विजयावर मात्र तिने आनंद व्यक्त केला आहे.
भारतीय वंशाच्या कमला हॅरीस होणार अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष
कमला हॅरीस या डेमोक्रेटीक पक्षाच्या उमेदवार असून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरीस यांच्या नावाची घोषणा केली होती. आता डेमोक्रेटीक पक्षाने अमेरिकेतील निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केल्यामुळे कमला हॅरीस यांनाही उपराष्ट्रपती पदाचा सन्मान मिळणार आहे. अमेरिकेतील या महत्त्वाच्या पदासाठी निवडणूक लढवणारी पहिली कृष्णवर्गीय महिला म्हणून कमला हॅरीस मैदानात उतरल्या होत्या. कमला हॅरीस यांचे मूळ भारतीय असून भारताशी त्यांचे जवळचे नाते आहे. हॅरिस यांची आई शामला गोपालन म्हणजे भारतीय आणि वडील डोनल्ड हॅरिस म्हणजे जमैकन. वडील ख्रिस्ती, आई हिंदू. कमला ब्लॅक बॅप्टिस्ट चर्चमधे जातात. नवरा डग्लस एमहॉफ हा ज्यू आहे.कमला हॅरीस यांचेभारताशी नात असल्यामुळेच तामिळनाडूतील थुलासेंद्रपुरम या गावात उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून कमला हरीस यांचे पोस्टर्स झळकले होते. येथील गावक-यांनी बॅनरबाजी करत कमला हॅरीस यांना आपला पाठिंबा दर्शवला होता.
जस्टिन ट्रूडो उत्तर द्या...! आता कंगना राणौत थेट कॅनडाच्या पंतप्रधानांवर बरसली
हाजिर हो! कंगनाला मुंबई पोलिसांकडून पुन्हा समन्स, १० नोव्हेंबरला हजर राहण्याचा आदेश....