जेएनयू छात्र संघाची माजी उपाध्यक्ष शेहला रशीदच्या वडिलांनी मुलीवर देश विरोध कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप लावला होता. यावर आता कंगना रनौतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने शेहलाच्या वडिलांचा व्हिडीओ ट्विट करत तिच्यावर निशाणा साधला आहे. ती तिच्या ट्विटमध्ये म्हणाली की, ती जन्मजात मूर्ख आहे.
कंगना रनौतने शेहलाच्या वडिलांचा व्हिडीओ ट्विट करत लिहिले की, 'देशद्रोहने तुम्हाला पैसा, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मित्र, सहयोग सगळं काही मिळेल. पण देशप्रमाने तुम्हाला वैरी मिळतील, संघर्ष मिळेल, पूर्वजांची सभ्यतेची लढाई मिळेल, तुमचं जीवन आहे तुमचा निर्णय असला पाहिजे, समजदारीचं जीवन जगायचंय की मूर्खतेचं? ....मी तर जन्मापासूनच मूर्ख आहे'.
शेहला कंगनाला म्हणाली होती मूर्ख
काही दिवसांपूर्वी शेहलाने कंगनाबाबत एक ट्विट केलं होतं. शेहला म्हणाली होती की, 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं हा काही निवणुकीचा मुद्दा नाहीये. याने तुम्हाला Z सिक्युरिटी किंवा पद्म भूषण मिळणार नाही. इडियट'. असं वाटतं कंगनाने यालाच उत्तर दिलं आहे.
शेहलाच्या वडिलांचा व्हिडीओ व्हायरल
शेहला रशीदच्या वडिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेहलाचे वडील अब्दुल रशीद यांनी सोमवारी जम्मू पोलीस महानिर्देशकांना पाठवलेल्या पत्राची प्रत दाखवली. ते म्हणाले की, त्यांची मुलगी शेहला आयएएसचे टॉपर राहिलेल्या शाह फैसलसोबत मिळून काश्मीरमध्ये हुर्रियतसारखी नवी संघटना उभी करण्याच्या प्रयत्नात होती.
ते पुढे म्हणाले की, त्यांची मुलगी आणि शाह फैसल काश्मीरी तरूणांना फूस लावून भडकावण्याचा प्रयत्न करत होती. पिता या नात्याने त्यांनी याला विरोध केला होता. ते म्हणाले की, आता याला विरोध केला तर त्यांच्या जीवाला धोका आहे. घरातून ती कशाप्रकारच्या गोष्टी करते याची चौकशी झाली पाहिजे.
यासोबतच शेहलाच्या वडिलांनी आणखीही काही गंभीर आरोप लावले आहे. काही दिवसांपूर्वीच शेहलाने वडिलांना अत्याचारी म्हटलं होतं आणि आईसोबत मिळून तिने त्यांच्याविरोधात केस दाखल केली होती. याचाही खुलासा तिच्या वडिलांनी केला होता.