Join us

आधी झुरळ म्हणाली, आता इरफान खानशी तुलना! '12th Fail' पाहिल्यानंतर कंगनाची विक्रांत मेसीसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 11:59 AM

'12th Fail' पाहून रडली कंगना रणौत; आधी झुरळ म्हणणाऱ्या विक्रांत मेसीची केली इरफान खानशी तुलना

२०२३मध्ये सर्वाधिक चर्चा झालेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे '12th Fail'. विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक बिग बजेट चित्रपटांना तगडी टक्कर दिली होती. काही दिवसांपूर्वीच हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी चॅनेलवर प्रदर्शित झाला होता. सर्वच स्तरातून '12th Fail' सिनेमाचं कौतुक होत होतं. अनेक सेलिब्रिटींनीही या सिनेमाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. आता बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने '12th Fail' चित्रपटासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

कंगनाने नुकताच ओटीटीवर '12th Fail' सिनेमा पाहिला. हा सिनेमा आणि विक्रांतचा अभिनय पाहून कंगना थक्क झाली आहे. '12th Fail'बाबत खास पोस्ट शेअर करत तिने विक्रांतची तुलना इरफान खानशी केली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये '12th Fail'साठी खास पोस्ट लिहिली आहे. कंगना म्हणते, "काय चित्रपट आहे. मी सुद्धा गावातील हिंदी मिडियममध्ये शिकली आहे. याआधी मी विमाात चित्रपट पाहून रडलेले नाही. माझ्या शेजारी बसलेल्या प्रवाशांना माझी काळजी वाटत होती." 

"विधू सर तुम्ही आमची मनं जिंकली आहेत. विक्रांत मेसी तू कमाल आहेस. इरफान खान सरांमुळे अपुरी राहिलेली जागा येणाऱ्या काळात विक्रांत भरू शकतो. तुझ्यातील टॅलेंटला सलाम," असंही कंगनाने पुढे म्हटलं आहे. याबरोबरच कंगनाने '12th Fail'मधील रिअल लाइफ IPS मनोज कुमार शर्मा आणि IRS श्रद्धा जोशी यांचा फोटो शेअर करत कंगनाने त्यांचंही कौतुक केलं आहे. 12th Fail' सिनेमा हा युपीएससी या स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा संघर्ष प्रवासावर आधारित आहे. १२वीत नापास होऊनही स्पर्धा परीक्षांचा लक्षभेद करत IPS अधिकारी झालेल्या मनोज कुमार मिश्रा यांचा प्रवास या चित्रपटातून दाखविण्यात आला आहे. विधु विनोद चोप्रा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

विक्रांत मेसीला कंगना म्हणाली होती झुरळ! 

आता इरफान खानशी तुलना करणाऱ्या विक्रांतला कंगना एकेकाळी झुरळ म्हणाली होती. यामी गौतमने लग्नानंतर तिचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर कमेंट करत विक्रांत "राधे मांप्रमाणे एकदम पवित्र", असं म्हणाला होता. त्याच्या या कमेंटवर रिप्लाय करत कंगनाने त्याला झुरळ म्हटलं होतं. "हा झुरळ कुठून आला, माझी चप्पल आणा", असं कंगना म्हणाली होती. 

टॅग्स :कंगना राणौतविक्रांत मेसीसेलिब्रिटीसिनेमा