जेव्हापासून कंगना रणौत सोशल मीडियावर अॅक्टिव झाली आहे तेव्हा सतत ती वादग्रस्त विधाने करून चर्चेत आहे. नुकतंच तिचं 'थलाइवी' सिनेमाच्या शूटींगचं एक शेड्यूल संपलं. त्यानंतर पुन्हा तिने बॉलिवूडवर हल्ला चढवला आहे. फिल्म इंडस्ट्रीत आपल्या कामाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कंगनाला इंडस्ट्रीला बॉलिवूड म्हणणंच पसंत नाही. नुकताच कंगनाने ट्विटरवर एक नवा हॅशटॅग India Reject Bollywood सुरू केला आहे.
कंगनाने बॉलिवूड या नावावरच टार्गेट करून एक ट्विट केलं आहे. कंगनाचं मत आहे की, बॉलिवूड हा शब्द अपमानजनक आहे. त्यामुळे लोकांनी हा शब्दच रिजेक्ट करावा. आश्चर्याची बाब म्हणजे कंगनाने सुरू केलेल्या या मोहिमेला ट्विटरवरून अनेक लोकांचा सपोर्टही मिळत आहे. कंगनाने ट्विटमध्ये लिहिले की 'इथे कलाकारही आहेत आणि भांड लोकंही आहेत. ही इंडियन फिल्म इंडस्ट्रीही आहे आणि इथे बॉलिवूडही आहे.#IndiaRejectsBollywood सर्वात हास्यास्पद शब्द बॉलिवूड हा हॉलिवूडमधून कॉपी करून चोरी केलेला आहे'. (बॉलिवूडमधील सर्व लांडगे...! न्यूज चॅनल्सविरोधात कोर्टात जाणाऱ्या सलमान-शाहरूखवर कंगना बरसली)
दरम्यान, याआधीही कंगनाने सोशल मीडियावर नेपोटिज्म आणि मुव्ही माफियासारखे हॅसटॅग प्रसिद्ध केले होते. आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की, कंगनाचा हा नवा हॅशटॅग फॅन्समध्ये किती पॉप्युलर होतोय. कंगनाच्या कामाबाबत सांगायचं तर तिने नुकतंच 'थलाइवी'चं शेड्यूल पूर्ण केलंय. त्यामुळे ती तिच्या घरी मनालीला परतली आहे. तसेच ती सध्या तिच्या आगामी 'तेजस' आणि 'धाकड' सिनेमाच्या शूटींगची तयारी करत आहे. (‘ते’ ट्विट पडले महागात, कंगना राणौतविरोधात कर्नाटकात गुन्हा)
दिग्गजांवर तोंडसुख
आता कंगनाने मीडिय हाऊसेस विरोधात कोर्टात जाणाऱ्या बॉलिवूड दिग्गजांवर तोंडसुख घेतले आहे. बॉलिवूडमधील लांडगे वृत्तमाध्यमांविरोधात एकत्र आले, अशी टीका तिने केली आहे.
बेजबाबदार, अपमानास्पद वृत्तांकन करणा-या दोन टीव्ही वाहिन्यांविरोधात शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर यांच्या विरोधात या सर्वांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे. नेमक्या याच मुद्यावर कंगनाने एक व्हिडीओ जारी केला. (कंगना म्हणाली - २० किलो वजन कमी करतीये, ट्रोलर म्हणाला - डोक्यातील भूसा कमी कर बस्स...)
या व्हिडीओत काही वर्कर्स फिल्मच्या सेटवर काम करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना कंगनाने मीडियाविरोधात कोर्टात जाणा-यांना लांडग्यांची उपमा दिली आहे. ‘बॉलिवूडमधील सर्व लांडगे एकत्र आलेत आणि आता मीडियावर हल्ला करण्याची तयारी करत आहेत. मजुरांवर, शेतक-यांवर, महिलांवर, देशातील गरिबांवर अन्याय होतो, त्यावेळी हे लोक कुठे जातात? आज ही मंडळी मानवाधिकाराच्या बाता मारताहेत, पण इतरांच्या हक्कांवर गदा येते तेव्हा हे मूग गिळून गप्प बसतात,’ अशा शब्दांत कंगनाने आपला संताप व्यक्त केला आहे.