Join us

कंगना राणौतची गाडी रुळावर येणार? 'पंगा क्वीन' आणि अजय देवगणमध्ये कडवी टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:33 IST

अभिनेत्रीचे शेवटचे ५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी होते.

अभिनेत्री कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' बऱ्याच प्रतीक्षेनंतर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी चर्चा आहे. या चित्रपटात कंगना राणौत हिनं अभिनेत्री म्हणून काम करण्यासोबतच दिग्दर्शिका म्हणूनही काम केलं आहे. 'इमर्जन्सी'कडून कंगनाला मोठ्या अपेक्षा आहेत. पण, बॉक्स ऑफिसवर कंगनाची टक्कर थेट अभिनेता अजय देवगणसोबत होत आहे.

रवीना टंडनची मुलगी राशा थडानी आणि अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण यांनी 'आझाद' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अजय देवगणदेखील आहे. त्यामुळे कंगनाचा सिनेमाला प्रेक्षक पसंती देतात की नाही हे आजच्या ओपनिंगवरुन स्पष्ट होईल. जर 'इमर्जन्सी'ने खरोखरच 4 ते 5 कोटींनी खाते उघडले, तर कंगनाचा चित्रपट हा तिच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण याआधी, अभिनेत्रीचे शेवटचे ५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी होते.

कंगनाच्या शेवटच्या ५ चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील कमाई

  • तेजस - १.२० कोटी
  • धाकड - ५५ लाख
  • थलाईवी - ३२ लाख
  • पंगा - २.७० कोटी
  • जजमेंटल है क्या - ४.५० कोटी

 

गेल्या काही वर्षात अभिनेत्री म्हणून कंगनाने बॉक्स ऑफिस गाजवलं नाही. आता या सिनेमाच्या निमित्ताने ती आपला रेकॉर्ड सुधारेल अशी आशा आहे. 'इमर्जन्सी' या चित्रपटात कंगनाने देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १९७५ मध्ये देशभरात लादलेल्या आणीबाणीच्या काळाचे चित्रण करतो. भारताच्या लोकशाहीवर त्याचा कसा परिणाम झाला, याचे हे सिनेमात पाहायला मिळेल. या राजकीय नाट्यमय चित्रपटात कंगना व्यतिरिक्त अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी आणि मिलिंद सोमण हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

टॅग्स :कंगना राणौतअजय देवगणसेलिब्रिटी