सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. ड्रग्ज अँगेल समोर आल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. सुशांतच्या निधनापासून घराणेशाही आणि गटबाजी विरोधात बंड पुकारणारी बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतने ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. तिने एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडमधील ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ती म्हणाली की, मी बॉलिवूडचा तो काळा चेहरा देखील पाहिला आहे जिथे काही कलाकार ड्रग्स घेतात.
कंगना राणौतचं विधान रिया चक्रवर्तीच्या ड्रग चॅटनंतर समोर आला आहे जे एका न्यूज चॅनेलवर लीक झाले होते. ड्रग अँगल समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रियाच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. इतकेच नाही तर एका रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले आहे की, वीस टॉप बॉलिवूड आणि राजकीय नेत्यांची नावं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला देण्यात आली आहेत. आता याबद्दल कंगनाने दावा केला आहे की एकेकाळी बॉलिवूडमधील हाय और माइटी क्लबचा हिस्सा होती जिथे प्रत्येक दुसऱ्या पार्टीत सहभागी होत होती आणि तिथए प्रसिद्ध कलाकारांना ड्रग्स घेताना पाहत होती.
कंगना म्हणाली की, काही युवा कलाकार जे माझ्या वयाचे होते. ते वैयक्तिकरित्या ड्रग्स घेतात आणि शो करतात. या कलाकारांबद्दल ब्लाइंड आयटमदेखील लिहिले जात होते. डीलर सारखे असतात. सर्व काही एक प्रकारे हाताळले जाते. त्यांच्या पत्नीदेखील अशा पार्टी आयोजित करतात. तिथे पूर्णपणे वेगळे वातावरण असते. तिथे असे लोक भेटतात जे फक्त ड्रग्स घेतात आणि दुसऱ्यांसोबत दुर्व्यवहार करतात.
कंगना रानौत पुढे म्हणाली की, काही सरकारांनी या बॉलिवूडच्या ड्रग माफियांना पुढे जाण्यासाठी सहकार्य केले आहे. बॉलिवूड आणि ड्रग माफियांमध्ये रिलेशन आहे. ते एकमेकांना ओळखतात. सर्व एकच डीलर आणि पॅडलर्स आहेत. कलाकार ड्रग्सचे सेवन करतात. हे लोक घराणेशाहीला पाठिंबा देतात. त्यातील काही बालपणापासून ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत आणि मग ते अभिनेता किंवा दिग्दर्शक बनतात. या अभिनेत्यांपैकी एकाला मी डेट केले आहे. ते एका ठिकाणी जातात. ड्रिंकने सुरूवात करतात आणि मग एक रोल आणि एक गोळी मग ते नाकाने ओढतात. हे सगळे गुप्त संकेत असतात.
तिने पुढे सांगितले की, अभिनेत्यांच्या पत्नी घरी जातात आणि ड्रग्स घेतात. अकल्पनीय गैरवर्तन होते. मी पाहिले आहे की हे कसे अश्लील होत जाते आणि कित्येकदा स्थिती नियंत्रणाबाहेर जाते. काही वास्तविक गोष्टी नुकत्याच चित्रपटात दाखवल्या आहेत पण सत्याला बाजूला ठेवले आहे.