Kangana Ranaut, India vs Bharat name controversy: सध्या देशाचे नाव भारत निश्चित करण्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. G-20 शी संबंधित निमंत्रण पत्रिकांवर भारताचे राष्ट्रपती असे नाव लिहिण्यात आल्याने देशभरात वादाला तोंड फुटले आहे. अशा स्थितीत संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडियाचे नाव बदलून भारत केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत. या वादावर लोक दोन गटात विभागले गेल्याचे दिसत आहे. लोकांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सारेच यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहात. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर भारत माता की जय असे लिहिले होते. त्यातच आता बॉलिवूडची 'क्वीन' कंगना राणौतनेही या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करताना कंगनाने सडेतोड मत मांडले आहे.
कंगना राणौतने काय लिहिले?
कंगना रणौतने ट्विट करून लिहिले, “इंडिया या नावात प्रेम दाखवण्यासारखे काय आहे? सर्वप्रथम, त्यांना ‘सिंधू’ चा उच्चार करता येत नव्हता म्हणून त्याने त्याचे विकृत रूप ‘इंडस’ केले. मग कधी हिंदूंना, हिंदोस संबोधले तर कधी इंडोस हाक मारली. काही तडजोडी करून त्याचे INDIA केले. महाभारताच्या काळापासून कुरुक्षेत्राच्या महायुद्धात सहभागी झालेली सर्व राज्ये भारत नावाच्या एका खंडाखाली आले. मग ते आम्हाला इंदू-सिंधू का म्हणत होते?"
अभिनेत्रीने पुढे लिहिले, “भारत हे नाव खूप अर्थपूर्ण आहे, भारताचा अर्थ काय? मला माहित आहे की ते आम्हाला रेड इंडियन म्हणतात कारण जुन्या इंग्रजीमध्ये इंडियन म्हणजे फक्त गुलाम, ते आम्हाला इंडियन म्हणतात कारण ब्रिटिशांनी आम्हाला दिलेली ही नवी ओळख होती. जुन्या काळातील शब्दकोषांमध्येही इंडियन म्हणजे गुलाम असे म्हटले जाते. यात अलीकडे बदल करण्यात आला आहे. हे आमचे नाव नाही, आम्ही भारतीय आहोत, इंडियन नाही."