बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या पाली हिल येथील कार्यालयावर नुकताच मुंबई महापालिकेने हातोडा चालवला. पालिकेच्या या कारवाईनंतर कंगना व शिवसेना यांच्यातील वाद टीपेला पोहोचला आहे. कार्यालयावर झालेल्या कारवाईनंतर कंगना चवताळली आहे. शिवसेना आणि ठाकरे सरकारवर सतत टीका करत आहे. अशात मुंबई पालिकेने कंगनाला आणखी एक जोरदार झटका देण्याची तयारी चालवली आहे. पालिकेने आता कंगनाच्या खार येथील फ्लॅटमध्ये केलेल्या अनधिकृत बांधकामावरून नोटीस बजावली आहे.
मुंबईताल खार वेस्टमध्ये एका बिल्डिंगमध्ये कंगनाचा एक फ्लॅट आहे. या बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर कंगना राहाते. पाचव्या मजल्यावर कंगनाचे एक नाही तर तीन फ्लॅट आहेत. हे तिन्ही फ्लॅट्स कंगनाच्या नावावर आहेत. 8 मार्च 2013 रोजी तिन्ही फ्लॅटची रजिस्ट्री झाली होती. कंगनाने फ्लॅट घेतल्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच 13 मार्च 2018 रोजी बीएमसीकडे एक तक्रार आली होती. तिने फ्लॅट्समध्ये बेकायदा बांधकाम केल्याचं तक्रारीत म्हटले होते.या तक्रारीनंतर 26 मार्च 2018 रोजी बीएमसीच्या अधिका-यांनी कंगनाच्या या फ्लॅट्सची पाहाणी केली होती. त्याच दिवशी कंगनाला नुसार नोटिस बजावण्यात आली होती. आता कंगनाला याप्रकरणी नव्याने नोटीस बजावली आहे.
असे आहे अवैध बांधकामइलेक्ट्रिक फिटिंगचे संक सिमेंटने भरून त्याचा कार्पेट एरियासाठी वापर केला गेला आहे.झाडे लावण्यासाठीच्या जागेवर जीना बांधला आहे.खिडकीवरचे लोखंडाचे ग्रील काढून बाल्कनी म्हणून वापर केला गेला आहे.काही भींती तोडून बाल्कनीत रूपांतर करून एक खोली बनवण्यात आली आहे.तिन्ही फ्लॅटसाठी दिलेल्या कॉमन जागेवर अवैध दरवाजा बनवण्यात आला आहे.तिन्ही फ्लॅट जोडण्यासाठी कॉमन भींतीचीही तोडफोड करण्यात आली.
बीएमसीच्या दाव्यानुसार, हे सगळे बांधकाम कंगनाच्या कार्यालयाच्या तुलनेत अधिक गंभीर उल्लंघन आहे़ तिने अक्षरश: नियमांची पायमल्ली केली आहे.
म्हणे, शरद पवार उत्तरदायीकंगनाच्या खार परिसरात असलेल्या फ्लॅटवरुन कंगनाने शरद पवारांकडे बोट दाखवले होते. यासंदर्भात तिने एक ट्वीट केले होते. ‘महाराष्ट्र सरकारचे पेड सोर्स चुकीची माहिती पसरवत आहेत. बीएमसीने कालपर्यंत मला कधीही नोटीस पाठविली नाही. खरं तर सर्व कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी मी स्वत: सर्व कागदपत्रं बीएमसीला दिली होती. बीएमसीसमोर किमान आपल्या धैर्याने उभे राहण्याची ताकत माझ्यात आहे. आता खोटं का बोलत आहेत? हा फक्त माझाच नाही तर संपूर्ण इमारतीचा प्रश्न होता, केवळ माझ्या फ्लॅटचा इश्यू नाही. ज्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने सामोरे जाण्याची गरज आहे. ही इमारत शरद पवारांशी संबंधित आहे. आम्ही हा फ्लॅट त्यांच्या पार्टनरकडून खरेदी केला आहे. म्हणूनच ते यासाठी उत्तरदायी आहेत, असे तिने ट्वीटमध्ये म्हटले होते.
कंगनावर दुसरा वार करण्याची तयारी, आता मुंबई पोलीस करणार ड्रग्स केसची चौकशी
कंगना म्हणाली, मी कार्यालयाची दुरूस्ती करणार नाही...; कारण वाचून बसेल धक्का