चित्रपटांपेक्षा आपल्या सततच्या टिवटिवीमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हिने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना महामारीमुळे घोषीत करण्यात आलेल्या लॉकडाऊनवर तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपल्या ट्विटमध्ये कंगनाने महाराष्ट्र सरकारला ‘चंगू मंगू गँग’ संबोधले आहे. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती बिकट आहे. अनेक शहरात नाईट लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. शिवाय येत्या एक-दोन दिवसांत कडक लॉकडाऊन लावण्याचीही तयारी महाराष्ट्र सरकारने चालवली आहे. याच पार्श्वभूमीवर कंगनाने ट्विट केले. (Maharashtra has a lockdown?)
काय म्हणाली कंगना?
झाली ट्रोल
कंगनाने ट्विट करून उद्धव सरकारवर रोष व्यक्त केला, पण हे ट्विट तिलाच महागात पडले. या ट्विटनंतर कंगनालाच लोक ट्रोल करू लागलेत. चंगू मंगू गँग नरेंद्र मोदी व अमित शाहसाठी तर लिहिले नाहीस ना? असा खोचक प्रश्न अनेक युजर्सनी तिला विचारला.
अनेकांनी तिच्या चित्रपटाचे प्रदर्शन लांबल्याचे निमित्त साधून तिची खिल्ली उडवली. महाराष्ट्राचे माहित नाही, पण कंगनाचा मेंदू पूर्ण लॉकडाऊन झाला आहे, अशी कमेंट करत एका युजरने तिला ट्रोल केले.वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर कंगनाचा ‘थलायवी’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. येत्या 23 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. पण कोरोना व्हायरसमुळे या सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. याशिवाय धाकड आणि तेजस या सिनेमात कंगना झळकणार आहे. या सिनेमाचे शूटींगही पूर्ण झाले आहे.