Join us

Kangana Ranaut : कंगना रणौतने सलमान खानसोबत साजरी केली ईद, समोर आले पार्टीचे व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 13:38 IST

Kangana Ranaut Eid Party Videos: कंगना फार कमी अशा पार्टिजमध्ये दिसते. त्यामुळे अर्पिता खानच्या ईदच्या पार्टीमध्ये कंगना दिसल्याने सगळेच हैराण झाले आहेत.

Kangana Ranaut Eid Party Videos: सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) ची बहीण अर्पिता खान शर्मा (Arpita Khan Sharma) ने ईद निमित्ताने आपल्या घरी शानदार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक मोठ्या स्टार्सनी हजेरी लावली. पण सर्वात जास्त चर्चा रंगली ती कंगना रणौतची. कंगना फार कमी अशा पार्टिजमध्ये दिसते. त्यामुळे अर्पिता खानच्या ईदच्या पार्टीमध्ये कंगना दिसल्याने सगळेच हैराण झाले आहेत.

कंगना रणौतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कंगना ईद पार्टीला सुंदर ट्रेडिशनल लूकमध्ये आली होती. कंगनाने गाडीतून उतरताच फोटोग्राफर्सना पोज दिल्या आणि फ्लाइंग किसही केलं. यादरम्यान कंगना खूप आनंदी दिसली. कंपनाने सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ती ईदच्या सेलिब्रेशनसाठी अर्पिताच्या घरात गेली.

कंगनाचा ईदचा लूक फॅन्सना चांगलाच आवडला. यावेळी कंगनाने हेवी शरारा सूट घातला होता. ज्यात ती आणखीनच सुंदर दिसत आहे. कंगनाने आपला लूक कम्प्लिट करण्यासाठी नेकलेस आणि मोठे इअररिंग्स घातले होते. सोबतच तिने न्यूड मेकअप केलं होत.

अर्पिता खानच्या घरी होस्ट करण्यात आलेल्या ग्रॅंड पार्टीमध्ये कंगनाच्या जबरदस्त एन्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं. कंगनाला या पार्टीमध्ये बघून फॅन्स आनंदी दिसले. लोक आता याचा अंदाज लावत आहे की, सलमान खान आणि कंगना रणौत यांच्यातील अंतर आता कमी होईल. कंगनाचा हा अंदाज बघून सध्या इंडस्ट्रीत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. चर्चा तर अशीही होत आहे की, सलमान आणि कंगना एखाद्या आगामी सिनेमात तर दिसणार  नाही ना. 

टॅग्स :कंगना राणौतअर्पिता खानसलमान खानबॉलिवूड