Join us

 कंगना राणौत मंडी पोटनिवडणूक लढणार का? अभिनेत्री काय म्हणाली वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 11:49 AM

मंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामस्वरूप शर्मा यांचे बुधवारी निधन झाले. लवकरच येथे पोटनिवडणूक होईल. ही जागा कंगना लढवणार असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देकंगनाच्या या ट्वीटवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे मंडी पोटनिवडणूक लढण्यात कंगनाला काहीही रस नाही.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या सिनेमांपेक्षा तिच्या रोज नव्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. तूर्तास कंगना राजकारणात एन्ट्री घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना पोटनिवडणूक लढवणार असल्याची चर्चाही ऐकायला मिळतेय. मंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामस्वरूप शर्मा यांचे बुधवारी निधन झाले. त्यांचा मृतदेह दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी संशयास्पदस्थित आढळून आला होता. शर्मा यांच्या निधनानंतर मंडीची जागा रिक्त झाली आहे आणि लवकरच येथे पोटनिवडणूक होईल. हीच जागा कंगना लढवणार असल्याची चर्चा आहे.बुधवारी एका युजरने या चर्चेला तोंड फोडले. ‘माझे हे ट्वीट सांभाळून ठेवा. आता कंगना राणौत मंडी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची तयारी करणार...,’ असे या युजरने लिहिले.   कंगनाने या युजरच्या ट्वीटवर केवळ रिप्लायच दिला नाही, तर आपल्याला ग्वाल्हेरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आली होती, असा खुलासाही तिने केला.

काय म्हणाली कंगना...

युजरच्या ट्वीटला उत्तर देताना कंगनाने लिहिले, ‘2019 मध्ये मला ग्वाल्हेरमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा पर्याय देण्यात आला होता. हिमाचल प्रदेशची लोकसंख्या 70 ते 80 लाख आहे. येथे फार गरीबी व गुन्हेगारी नाही. मी राजकारणात आलेच तर, अशा राज्यांतून निवडणूक लढेल, जिथे अधिक जास्त आव्हाने असतील. माझ्या कष्टाने मी या क्षेत्रातही ‘क्वीन’ बनण्याचा प्रयत्न करेन. तुमच्यासारखे लोक हे सगळे समजू शकत नाही. ’

याशिवाय तिने आणखी एक ट्वीट केले. ‘हिमाचल प्रदेशातील राजकीय नेत्याच्या इु:खद निधनानंतर नाहक चर्चा करणाºया प्रत्येक मूर्खाने माझे ट्वीट वाचायला हवे. माझ्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी करण्याआधी माझी उंची बघा. बब्बर शेरनी राजपुताना कंगनाबद्दल बोलताना छोट्या छोट्या नाही तर मोठ्या गोष्टीच बोला.... ’, असे तिने या ट्वीटमध्ये लिहिले.कंगनाच्या या ट्वीटवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे मंडी पोटनिवडणूक लढण्यात कंगनाला काहीही रस नाही. पण हो, राजकारणात येण्याची तिची तीव्र इच्छा आहे. योग्य संधी आणि मनासारखे झाले तर ती कधीही राजकारणात एन्ट्री मारू शकते.

टॅग्स :कंगना राणौत