Join us

Chandramukhi 2: रजनीकांत स्टारर 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये कंगना रनोटची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 7:22 PM

कंगना रनोट रजनीकांत यांच्या 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार असून, लवकरच ती शूटिंग सुरू करेल.

Kangana Ranut in Chandramukhi 2: आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रनोट सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सोमवारी, तिने तिच्या बहुप्रतिक्षित 'इमर्जन्सी' चित्रपटच्या आसाम शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले. आता तिच्या नवीन प्रोजेक्टबद्दल माहिती समोर आली आहे. 

इंग्लिश न्यूज वेबसाईट इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, कंगना रनोट रजनीकांत यांच्या 'चंद्रमुखी' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. पी वासू चंद्रमुखी-2चे दिग्दर्शन करणार असून, या चित्रपटात कंगनासोबत तामिळ सूपरस्टार राघव लॉरेन्स मुख्य भूमिकेत असेल. कंगना 'इमर्जन्सी'चे आसाम शेड्यूल संपवून एक छोटा ब्रेक घेईल आणि ब्रेकवरून परतल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'चंद्रमुखी'ला सुरुवात करेल. यानंतर 'इमर्जन्सी'चे शूटिंग आटोपल्यानंतर पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये 'चंद्रमुखी'चे दुसरे शेड्यूल सुरू करणार आहे.

चंद्रमुखी हा रिमेकचा रिमेक आहे'चंद्रमुखी' हा 2005 चा तमिळ हॉरर ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये रजनीकांत आणि अभिनेत्री ज्योतिका सरवणन मुख्य भूमिकेत होते. 'चंद्रमुखी' हा 2004 च्या कन्नड चित्रपट 'अप्तमित्रचा' रिमेक होता, तर 'अप्तमित्र' हा 1993 च्या मल्याळम चित्रपट 'मणिचित्रथजू'चा रिमेक होता. चंद्रमुखीवर हिंदीमध्ये 'भुल भुलैय्या' नावाने चित्रपट झाला आहे, ज्यात अक्षय कुमार आणि विद्या बालन मुख्य भूमिकेत होते.

कंगना रनोटचे आगामी चित्रपटकंगना रनोटच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती सर्वेश मारवा दिग्दर्शित 'तेजस' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती एअरफोर्स पायलटची भूमिका साकारत आहे. याशिवाय ती 'इमर्जन्सी', 'सीता' आणि 'इमली' या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती अखेरची 'धाकड' या चित्रपटात दिसली होती.

 

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडरजनीकांत