'सुशांतवर रेपचे आरोप झाले तेव्हा का नाही ऐकवले मैत्रीचे किस्से?', कंगना रानौत भडकली संजना सांघीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 01:02 PM2020-07-27T13:02:08+5:302020-07-27T13:02:37+5:30
कंगना रानौतने सुशांतचा शेवटचा सिनेमा दिल बेचारामधील सहअभिनेत्री संजना सांघीवरदेखील निशाणा साधला.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला महिना उलटला असून अद्याप त्याच्या आत्महत्ये मागचे कारण समजू शकलेले नाही. मात्र त्याच्या निधनानंतर सोशल मीडियावर घराणेशाही, गटबाजीवर जोरदार टीका होऊ लागली. त्यात बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतनेदेखील सोशल मीडियावर नेपोटिझम व गटबाजीविरोधात निशाणा साधायला सुरूवात केली. कंगनाने बॉलिवूडमधील अभिनेत्रींवर टीका केली. या दरम्यान तिने सुशांतचा शेवटचा सिनेमा दिल बेचारामधील सहअभिनेत्री संजना सांघीवरदेखील निशाणा साधला.
कंगनाच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर सुशांत आणि संजनावर लिहिलेले जुने आर्टिकलची लिंक शेअर करण्यात आली आहे. या आर्टिकलमध्ये लिहिले होते की, सुशांतच्या एक्स्ट्रा फ्रेंडली वर्तुणूकीमुळे त्रस्त होऊन संजनाने शूटिंगमध्येच सोडली होती. हे आर्टिकल शेअर करत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, अनेक वृत्तांमध्ये दावा करण्यात आला होता की, सुशांतने संजनाचा रेप केला होता, अशा प्रकारच्या बातम्या त्या काळात सामान्य झाल्या होत्या, तेव्हा संजनाला याविषयी बोलण्याची गरज का वाटली नाही? जेव्हा सुशांत जिवंत होता तेव्हा संजनाने त्याच्यासोबतच्या मैत्रीचे किस्से एवढ्या तल्लीनतेने सर्वांना का नाही ऐकवले?@mumbaipolice चौकशी करा.
Many blinds claimed tht Sushant raped Sanjana,such news abt her harassment wr common in those days,Why Sanjana took her own sweet time to clarify?Why she nvr spoke so passionately abt her friendship with him when he ws alive? @mumbaipolice cn investigate🙏https://t.co/C2wvzuXuGU
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) July 22, 2020
2018 मध्ये बॉलिवूडमध्ये मीटू मोहिमेला सुरुवात झाली होती, तेव्हा सुशांतचेही नाव समोर आले होते. अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले होते की, सुशांतने आपली दिल बेचाराची को-स्टार संजना सांघीसोबत वाईट वर्तन आणि तिचे सेक्शुअल हरॅशमेंट केली.
यानंतर संजनाने 2018 मध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून स्पष्टीकरण देत म्हटले होते की, मला हे स्पष्ट करायचे आहे की, दिल बेचाराच्या सेटवर माझ्यासोबत वाईट वर्तन आणि सेक्शुअल हरॅशमेंट अशी कोणतीही घटना घडली नव्हती. या सर्वत निराधार वृत्तांना पूर्णविराम द्या.