'मणिकर्णिका'च्या रिलीज डेटबाबत अखेर कंगना राणौतने सोडले मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 6:27 AM
सध्या बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत तिचा आगामी चित्रपट 'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झासी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कंगनाचे फॅन्स या ...
सध्या बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत तिचा आगामी चित्रपट 'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झासी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. कंगनाचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कंगनाचा हा चित्रपट यावर्षीच्या एप्रिल महिन्यात रिलीज होणार होता. मात्र त्याची रिलीज डेट पुढे ढकलली. कंगनाने यावर आता पर्यंत मौन बाळगले होते मात्र आता पहिल्यांदा तिने आपले मौन सोडले आहे. कंगना म्हणाली, आम्ही मणिकर्णिकाची शूटिंग गतवर्षीच्या मे महिन्यापासून सुरू केली आहे. आता फक्त याला एक वर्षच झाले आहे. जेव्हा तुम्ही एखादा मोठा चित्रपट तयार करत असतात त्यासाठी एक ते दीड वर्षांचा कालावधी तुम्हाला लागतो आणि आम्ही याच वर्षी हा चित्रपट रिलीज करणारच आहोत. या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरु असल्यामुळे चित्रपटाची रिलीज डेट ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार रजनीकांत यांच्या '2.0' चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर होणारे क्लैशस टाळण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आत मणिकर्णिकाचे निर्माते हा चित्रपट सप्टेंबरमध्ये रिलीज करण्याचा विचार करतायेत. ALSO READ : म्हणून 'मणिकर्णिका'साठी कंगणा राणौतने घेतले इतके कोटींचे मानधन'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपट कंगना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अंकिता लोखंडे यात राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. ती याचित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री घेते आहे.सामान्य कुटुंबात जन्मलेल्या झलकारीबाईने आपल्या शौर्याने आणि बुद्धिचातुर्याने राणी लक्ष्मीबाईच्या निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. या चित्रपटात कडून कंगना खूप अपेक्षा आहेत. बाहुबली’ आणि ‘बजरंगी भाईजान’ सारख्या चित्रपटांची कथा लिहिणारे विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.