तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिकमध्येअभिनेत्री कंगना राणौत मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘थलायवी’ नामक या बायोपिकचा फर्स्ट लूक अर्थात पहिले पोस्टर नुकतेच रिलीज झाले आणि कंगना ट्रोल झाली. होय, कंगनाचा हा लूक चाहत्यांना अजिबात भावला नाही. ‘थलायवी’च्या पहिल्या पोस्टरवर कंगना रणौत जयललितांसारख्याच ग्रीन केपमध्ये दिसत आहेत. जयललितांप्रमाणे विक्ट्री साइन देताना दिसत आहे. खरे तर या सिनेमाची घोषणा झाली अगदी तेव्हा पासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आणि या पोस्टरने चाहत्यांची निराशा केली. या पोस्टरवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘जणू एखादा पुतळा उभा केला आहे,’ असे एकाने लिहिले आहे.
अनेक युजर्सनी कंगनाचा हा लुक म्हणजे जयललितांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. अर्थात कंगनाच्या या लूकचे कौतुक करणारेही काही आहेत. ब-याच लोकांनी कंगनाचा लुक आणि तिच्या मेहनतीचे कौतुक केले आहे.
हा मेकअप खूप जड असतो. तसेच हा मेकअप सांभाळणे कलाकरांसाठी एक टास्क असतो. या सिनेमासाठी ती भरतनाट्यम आणि तमिळ भाषा सुद्धा शिकली. जयललिता यांच्या बायोपिकसाठी कंगनाने 20 कोटी रुपयांचे मानधन घेतल्याची चर्चा आहे.