कंगना राणौत म्हणजे बॉलिवूडची बेधडक, बिनधास्त अभिनेत्री. अनेक बड्या बड्यांना शिंगावर घेणारी, परखड बोलणारी आणि आपल्या अटींवर जगणाºया बॉलिवूडच्या या क्विनने स्वबळावर यश मिळवले. बंडखोरी आधीपासूनच अंगात होती. बॉलिवूडमध्ये हाच बंडखोर स्वभाव कंगनाची ओळख बनला. कंगनाने 2019मध्ये आपल्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत पहिला सिनेमा रिलीज केला तो म्हणजे 'मणिकर्णिका'. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केलीय. कंगनाचे प्रॉडक्शन हाऊसचे ऑफिस मुंबई स्थित वांद्रातल्या पाली हिलमध्ये आहे. याच प्रॉडक्शन हाऊसचे स्वप्न कंगना गेली 10 वर्षे बघत होती.
वर्कफ्रंट बाबात बोलायचे झाले तर, जयललीता यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या सिनेमासाठी कंगनानेही खूप मेहनत घेतली आहे. या सिनेमासाठी ती भरतनाट्यम आणि तमिळ भाषा सुद्धा शिकली आहे.प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. सिनेमात 1965 पासून ते 1973 पर्यंत जयललिता यांच्यासोबत एमजीआर यांनी सुमारे 28 चित्रपटांमध्ये काम केले होते. जयललिता यांचा एमजीआर यांच्यासोबतचा पहिला चित्रपट 'आइराथिल ओरुवन' होता.