जयललिता यांच्या पुण्यतिथीनिमित्त कंगना राणौतने वाहिली श्रद्धांजली, शेअर केले थलाइवीच्या सेटवरील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 04:12 PM2020-12-05T16:12:26+5:302020-12-05T16:13:01+5:30
कंगना जयललिता यांचा बायोपिक थलाइवीमध्ये जयललिता यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.
तमीळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची आज पुण्यतिथी आहे. या निमित्ताने अभिनेत्री कंगना राणौतने सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कंगना जयललिता यांचा बायोपिक थलाइवीमध्ये जयललिता यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होणार आहे.
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत सध्या खूप चर्चेत आहे. शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यादरम्यान तिने आता आगामी चित्रपट थलाइवीच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना श्रद्धांजली वाहिली आहे.आज जयललिता यांची पुण्यतिथी आहे.
On the death anniversary of Jaya Amma, sharing some working stills from our film Thalaivi- the revolutionary leader. All thanks to my team, especially the leader of our team Vijay sir who is working like a super human to complete the film, just one more week to go 🙏 pic.twitter.com/wlUeo8Mx3W
— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 5, 2020
कंगना राणौतने तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती जयललिता यांच्या भूमिकेत दिसत आहे. हे तीन फोटोंमधील एक फोटो विधानसभेत चालताना त्यांच्या हातात एक फाइल आहे आणि त्यांच्या मागे दोन जण आहेत. तर दुसऱ्या फोटोत त्या कोणत्यातरी मिटींगसाठी उभ्या आहेत आणि तिथे उपस्थित असलेले लोक विचार करताना दिसत आहे. याशिवाय तिसऱ्या फोटोत एका शाळेतील मिड डे मिल जेवत असताना भेटायला गेलेले दिसत आहेत.
कंगना राणौतने शेअर करत लिहिले की, जय अम्मा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने थलाइवी - द रिव्हॉल्यूशनरी लीडरमधील काही फोटो शेअर केले आहेत. माझ्या टीमचे धन्यवाद. विशेष म्हणजे आमच्या टीमचे प्रमुख विजय सर ज्यांनी सुपर ह्युमन सारखा चित्रपट पूर्ण केला. आता एक आठवडा शिल्लक राहिला आहे.
चित्रपटात कंगना राणौतसोबत अरविंद स्वामीदेखील रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. जयललिता यांनी ५ डिसेंबर, २०१६ जगाचा निरोप घेतला. जयललिता यांनी करिअरची सुरूवात तमीळ चित्रपटात अभिनय करून केली होती. त्यानंतर राजकारणात आल्या होत्या. जयललिता तामीळनाडूच्या पाच वेळा मुख्यमंत्री राहिल्या होत्या.