Join us

कंगनाला 'ओपेनहायमर'चं कौतुक, इंटीमेट सीन आणि भगवद्गीता वाचनाच्या दृश्यांबद्दल म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 5:17 PM

Oppenheimer : कंगना रणौतने 'ओपेनहायमर'मधील 'त्या' वादग्रस्त दृश्यांबद्दल केलं भाष्य, म्हणाली...

'ओपेनहायमर' हा हॉलिवूड चित्रपट भारतात चांगली कमाई करताना दिसत आहे. वैज्ञानिक रॉबर्ट 'ओपेनहायमर' यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. क्रिस्तोफर नोलन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातील एका दृश्यामुळे 'ओपेनहायमर' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. 'ओपेनहायमर'ची भूमिका साकारलेल्या सिलियन मर्फी इंटीमेट सीन करताना भगवद्गीतेचं वाचन करत असल्याचं या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने चित्रपटातील या सीनचं समर्थन केलं आहे. 

कंगनाने नुकताच 'ओपेनहायमर' सिनेमा पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कंगनाने ओपेनहायमरबाबत भाष्य केलं आहे. "मी नुकताच 'ओपेनहायमर' सिनेमा पाहिला. हा चित्रपट मला आवडला. वर्ल्ड वॉर २मध्ये अमेरिकेला अणूबॉम्ब बनवून देणाऱ्या वैज्ञानिक 'ओपेनहायमर'ची ही गोष्ट आहे. या चित्रपटातील भगवद्गीता वाचतानाचा भाग मला आवडला. जिथे भगवान विष्णूचा उल्लेख केला गेला आहे." असं म्हणत कंगनाने 'ओपेनहायमर'मधील इंटीमेट सीन करताना भगवद्गीतेचं वाचन केल्याचा सीन आवडला असल्याचं म्हटलं आहे. 

धर्मेंद आणि शबाना आझमी यांच्या लिपलॉक सीनवर करण जोहरचं भाष्य, म्हणाला, "मी त्यांना..."

कंगनाने या व्हिडिओला "क्रिस्तोफर नोलनचा आतापर्यंतचा हा सगळ्यात चांगला चित्रपट आहे. या काळातील महत्त्वाचा चित्रपट...हा चित्रपट संपूच नये असं वाटत होतं...फिजिक्स आणि राजकारणाची मला आवड आहे. या चित्रपटाच्या मी प्रेमात आहे. माझ्यासाठी हे सिनेमॅटिक ऑरगॅजमझ आहे," असं कॅप्शन दिलं आहे. 

"अमृता तू खास आहेस", रणवीर सिंहच्या इन्स्टा स्टोरीने वेधलं लक्ष, अमृता खानविलकरही भारावली

दरम्यान, 'ओपेनहायमर' या चित्रपटाची भारतातही क्रेझ आहे. २१ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ११ दिवसांत या चित्रपटाने ९५.१५ कोटींची कमाई केली आहे. 

टॅग्स :कंगना राणौतहॉलिवूड