नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजे एनसीबीने ड्रग्स केसमध्ये दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटासारख्या बॉलिवूडमधील मोठ्या मंडळींना समन पाठवला. पुढील तीन दिवसात सर्वांना चौकशीसाठी बोलवलं जाईल. आता यावर कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे.
कंगनाने ट्विट करून लिहिले की, 'अखेर पहिल्यांदा बॉलिवूड माफिया मनवत आहे की, सुशांतला मारला गेला असू नये. पहिल्यांदा आपल्या क्रूरते, आपल्या मौनावर पश्चाताप होत असेल. पहिल्यांदा ते म्हणत असतील की, वेळ मागे घेऊन शकलो असतो तर'.
कंगनाला धमक्या
गेल्या काही महिन्यांपासून कंगना रणौत सतत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहे. तिने मुंबईची तुलना पीओकेशी केली होती. ज्यानंतर तिच्यावर फार टिका झाली होती. कंगनाने सांगितले होते की, यावरून तिला अनेक धमक्या मिळत आहेत. त्यामुळे तिला केंद्र सरकारने Y कॅटेगरीची सुरक्षा दिली होती.
दीपिका चॅटींगमध्ये काय म्हणाली?
एनसीबीला दीपिकाच्या मिळालेल्या चॅटींगमध्ये D म्हणजे दीपिका पादुकोण ज्या K ने 'माल' म्हणजे ड्रग्सची मागणी करत आहे ती करिश्मा प्रकाश आहे. ती KWAN टॅलेंट मॅनेजमें एजन्सीची कर्मचारी आहे. दीपिकाच्या प्रश्नावर करिश्मा म्हणाली की, 'माझ्याकडे आहे पण घरी आहे. मी बांद्र्याला आहे.' करिश्मा पुढे लिहिले की, 'जर हवं असेल तर मी अमितला विचारू शकते'. यावर दीपिकाच उत्तर येतं की, 'हो प्लीज'.
रिया चक्रवर्तीने घेतली २५ मोठी नावे
दरम्यान जेव्हा सुशांत सिंह राजपूत केसमध्ये रिया चक्रवर्तीची चौकशी केली गेली तेव्हा तिने ड्रग्सची बाब मान्य केली होती. तिने यावेळी बॉलिवूडमधील २५ मोठ्या सेलिब्रिटींची नावे घेतली होती जे ड्रग्सचं सेवन करतात. त्यानंतर रियाला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं. नंतर जया साहासहीत ड्रग्स पेडलर्सच्या चौकशीतून समोर आले की, बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स ड्रग्सचं सेवन करतात. यात सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि श्रद्धा कपूरसारख्या अभिनेत्रींचाही समावेश आहे.
कंगना राणौत जर ड्रग्स घेत असेल तर तिचीही चौकशी करावी: विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
दीपिका, सारा, श्रद्धासह ७ जणांना एनसीबीकडून समन्स; तीन दिवसांत हजर राहावं लागणार
दीपिका पादुकोणसोबत करिश्मा गोव्यात?, एनसीबीच्या समन्सवर दिले होते हे कारण