शनिवारी नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आणि नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्री कंगना राणौत कायद्याच्या कचाट्यात सापडली. सुशांत सिंग राजपूत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली वांद्रे कोर्टाने तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार मुंबई पोलिसांनी कंगनाविरोधात एफआयआर दाखल केली. आता यावर कंगना प्रत्युत्तर देणार नाही, हे शक्यच नाही. एक ट्वीट करत तिने यावरून महाराष्ट्र सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला.
ट्वीटसोबत आपले काही फोटो शेअर करत तिने ठाकरे सरकारला लक्ष्य केले. ‘नवरात्रीचा उपवास कोण कोण करतेय? मीही उपवास करतेय आणि हे फोटो आजच्या पूजेचे आहेत. याचदरम्यान माझ्याविरोधात एफआयआर दाखल झाली आहे. माझ्या मते, महाराष्ट्रात बसलेली पप्पू सेना माझ्यावर भाळली आहे. मला इतके मिस करू नका. मी लवकरच तिकडे येणार आहे,’ असे ट्वीट कंगनाने केले आहे.
काय आहे प्रकरणमोहम्मह अश्रफुल्ला सय्यद नावाच्या व्यक्तीने वांद्रे सत्र न्यायालयात तक्रार केली होती. सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून अभिनेत्री कंगना राणौतने बॉलिवूड आणि एका समाजाविरोधात वक्तव्ये केली होती. तसेच सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. सोबत कंगनाचे ट्वीट, व्हिडीओ या व्यक्तीने न्यायालयात सादर केले होते. यावर सुनावणी करताना न्यायालयाने कंगनावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. कंगनावर दाखल झालेली ही पहिली एफआयआर नाही. यापूर्वी कर्नाटकमध्ये शेतक-यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावून कोर्टाच्या आदेशानंतर तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती.
कंगना रणौतची टिवटिव सुरूच; आता म्हणे, लोकांनी बॉलिवूड हा शब्दच रिजेक्ट करावा!
बॉलिवूडमधील सर्व लांडगे...! न्यूज चॅनल्सविरोधात कोर्टात जाणाऱ्या सलमान-शाहरूखवर कंगना बरसली