बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि राजकुमार राव स्टारर ‘मेंटल है क्या’ प्रदर्शनापूवीच वादात सापडला आहे. चित्रपटाचे नवे पोस्टर्स रिलीज झाल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन साइकेट्रिक सोसायटीने ‘मेंटल है क्या’ या टायटलवर आणि चित्रपटाच्या पोस्टर्सवर तीव्र आक्षेप नोंदवत, सेन्सॉर बोर्ड, माहिती व प्रसारण मंत्रालय, पीएमओ अशा सगळ्यांना पत्र लिहिले आहे. केवळ इतकेच नाही तर दीपिका पादुकोणच्या ‘द लिव्ह लाफ फाऊंडेशन’नेही या चित्रपटाच्या मेकर्सवर टीका करत, आपल्या जबाबदारीचे भान ठेवा, असे म्हटले आहे. आता या सगळ्या वादावर नेहमीप्रमाणे कंगनाच्या वतीने तिची बहीण रंगोली मैदानात उतरली आहे.
‘मेंटल है क्या’ वाद जोरात! कंगना राणौतच्या वतीने बहिण मैदानात!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 11:11 AM
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि राजकुमार राव स्टारर ‘मेंटल है क्या’ प्रदर्शनापूवीच वादात सापडला आहे. चित्रपटाचे नवे पोस्टर्स रिलीज झाल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन सायकिएट्रिक सोसायटीने ‘मेंटल है क्या’ या टायटलवर आणि चित्रपटाच्या पोस्टर्सवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
ठळक मुद्दे‘मेंटल है क्या’ हा चित्रपट एकता कपूर प्रोड्यूस करतेय. तर प्रकाश कोवेलामुडी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.