कंगना राणौत राजकारणात यायला तयार, पण....!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 7:26 AM
गेल्या काही दिवसांपासून कंगना राणौत राजकारणात येणार, अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. अद्याप कंगना यावर उघड बोलली नाही. पण ...
गेल्या काही दिवसांपासून कंगना राणौत राजकारणात येणार, अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. अद्याप कंगना यावर उघड बोलली नाही. पण कालच्या एका इव्हेंटमध्ये कंगना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोरदार प्रशंसा करताना दिसली. मी नरेंद्र मोदी यांची खूप मोठी फॅन आहे. मी खूप पेपर वाचत नाही. पण नरेंद्र मोदी एक सक्सेस स्टोरी आहेत. एक चहावाला आज देशाचा पंतप्रधान आहे. अर्थात हा त्यांचा नाही तर देशाच्या लोकशाहीचा विजय आहे. जग कधीच परफेक्ट असू शकत नाही. पण आपण त्याना बॅलेन्स करू शकतो, असे कंगना म्हणाली. तिच्या या बोलण्यावरून कंगनाच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.खरे तर राजकारण येण्यास कंगनाची जराही ‘ना’ नाही. पण तिची एक अट आहे. होय, ताज्या इव्हेंटमध्ये कंगनाने ही अटही बोलून दाखवली. मला राजकारणात येण्यास काहीही अडचण नाही. पण मला नेत्यांचा फॅशन सेन्स आवडत नाही. मला माझ्या ग्लॅमरसह राजकारणात स्वीकारण्यास लोक तयार असतील तर मी राजकारण येऊ शकते, असे ती म्हणाली. आता कंगनाचे हे म्हणणे हसण्यावारी न्यायचे की, त्यात ते तिच्या राजकीय प्रवेशाचे संकेत म्हणून घ्यायचे हे तुमच्यावर आहे.ALSO READ : कंगना राणौत म्हणते, लोक मला ‘सायको’ म्हणायचे, ‘या’ चित्रपटाने दूर होईल त्यांचा गैरसमज!तूर्तास कंगना ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांशी’ या चित्रपटात बिझी आहे. अर्थात अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट आलेली नाही. आधी हा चित्रपट यावर्षी एप्रिलमध्ये येणार, अशी खबर होती. पण मध्यंतरी या ऐतिहासिक चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची खबर आली. इंग्रज आणि झांसीची राणी यांच्यातील लढाईवर आधारित असलेला हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर आल्यास लोकांच्या भावना ‘कॅश’ करता येतील, या कारणाने हा चित्रपट लांबणीवर टाकण्यात आल्याचे कळते.याशिवाय ‘मेंटल है क्या’ हा कंगनाचा आणखी चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे.