Join us

‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’साठी कंगना राणौतने घेतला मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 9:43 PM

‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाचा टीजर येत्या २ आॅक्टोबरला रिलीज होतोय आणि विशेष म्हणजे, या टीजरमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून केवळ क्रिश यांचे एकट्याचेच नाव असणार आहे.

‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाचा टीजर येत्या २ आॅक्टोबरला रिलीज होतोय आणि विशेष म्हणजे, या टीजरमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून केवळ क्रिश यांचे एकट्याचेच नाव असणार आहे. याचाच अर्थ कंगनाने ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’चे दिग्दर्शक म्हणून श्रेय घेण्यास नकार दिला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ चर्चेत आहे. क्रिश हे या चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही पॅचवर्क व नवे सीन्स टाकण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत क्रिश आपल्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बिझी झालेत. त्यांच्या अनुपस्थित चित्रपटाचे काम कोण पुढे नेणार हा प्रश्न असताना कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. पण कंगना प्रत्यक्ष दिग्दर्शन सुरु करते ना करते, तोच अभिनेता सोनू सूदने चित्रपटातून अंग काढून घेतले. कंगनाच्या उर्मट वागण्याला कंटाळून त्याने असे केल्याचे सांगितले गेले आणि आरोप-प्रत्यारोपाचा एक अंग गाजला.याचबरोबर कंगना या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून क्रेडिट घेईल, असेही मानले गेले. पण ताज्या बातमीनुसार, असे करण्यास कंगनाने स्वत:हून नकार दिला आहे. क्रिश यांच्यासोबत कंगनाचे नावही दिग्दर्शक म्हणून देण्याची आॅफर झी स्टुडिओने कंगनाला दिली. पण कंगनाने म्हणे, यास नकार दिला. चित्रपट पूर्ण करणे आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य होते. मला कुठलेही क्रेडिट नको, असे कंगनाने म्हणे स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :कंगना राणौतमाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी