बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या 'थलायवी' या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकताच तिची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानंतर आता कंगना 'सीता - द इंकार्नेशन' या चित्रपटात ती सीतेची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कंगना सातत्याने प्रकाशझोतात येत आहे. यामध्येच आता कंगनाने तिच्या बालपणीचा एक फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
कंगनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती शाळेच्या गणवेशात शेतात उभी आहे. तिच्यासोबत तिची बहीण रंगोलीदेखील दिसून येते. विशेष म्हणजे या फोटोमध्ये कंगनाच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. "Small school in the valley called Hill View … year 1998 Himachal Pradesh…", असं कॅप्शन कंगनाने या फोटोला दिलं आहे.
दरम्यान, या फोटोच्या माध्यमातून कंगनाने तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कंगना अनेकदा सोशल मीडियावर हिमाचल प्रदेशातील तिच्या बालपणीचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे अनेकदा ती चाहत्यांमध्ये चर्चेत येते.