Join us  

Kangana Ranaut: करण जोहरच्या हिंदी कवितेवर कंगनाचा टोला, म्हणाली, 'आज याची हिंदी सुधारली...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 8:53 AM

करण जोहरच्या कवितेचा स्क्रीनशॉट पोस्ट करत कंगनाने टोला लगावला आहे.

दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) पुन्हा अडचणीत सापडला आहे. नेपोटिझम वरुन टीका होत असतानाच त्याने सार्वजनिक कार्यक्रमात अनुष्का शर्माचं (Anushka Sharma) करिअर संपवणार होतो असं कबूल केलं. करण जोहरवर सध्या सगळीकडूनच टीका होत असताना त्याने हिंदी कविता लिहित टीकाकारांना उत्तर दिले होते. करणच्या या हिंदी कवितेवरही बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने (Kangana Ranaut) निशाणा साधला आहे.

करण जोहरच्या कवितेचा स्क्रीनशॉट पोस्ट करत कंगनाने टोला लगावला आहे. कंगनाने लिहिले, 'एक वेळ अशी होती जेव्हा चाचा चौधरी एलाईट नेपो माफियांबरोबर मिळून नॅशनल टेलिव्हिजनवर माझी टर खेचायचे आणि अपमान करायचे. कारण मला इंग्रजी बोलता यायचे नाही. आज यांची हिंदी पाहून वाटलं, आता तर फक्त तुझी हिंदी सुधारली आहे पुढे बघा काय काय होतं.'

करण जोहरबाबत काहीही घडलं की कंगना संधी सोडत नाही. बॉलिवूड माफियांविरोधात कंगनाचं हत्यार तयारच असतं. मात्र करण कधीच कंगनावर पलटवार करताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रानेही बॉलिवूडची पोलखोल केली होती. काही लोक मिळून तिला कॉर्नर करत आहेत असं तिने म्हणलं होतं. यावरुन पुन्हा टीकाकारांनी करण जोहरला लक्ष्य केले. 

करणने काय लिहिले होते?

'लगा लो इल्जाम.... हम झुकने वालों में से नहीं, झूठ का बन जाओ गुलाम, हम बोलने वालों में से नहीं, जितना नीचा दिखाओगे, जितना आरोप लगाओगे, हम गिरने वालों में से नहीं, हमारा कर्म हमारी विजय है, आप उठा लो तलवार, हम मरने वालों में से नहीं।' 

(करा आरोप..मी झुकणार नाही, खोट्या गोष्टींवरच विश्वास ठेवा...मी बोलणाऱ्यातला नाही, जितकं कमी लेखाल, जितके आरोप कराल, मी पडणारा नाही, आपले कर्मच आपला विजय आहे..तलवार उचला...मी मरणारा नाही.)

टॅग्स :कंगना राणौतकरण जोहरबॉलिवूडसोशल मीडिया