बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि बॉलिवूडमधील काही कलाकारांचं ट्विटर वॉर सुरूच आहे. आता कंगनाने अभिनेत्री सोनम कपूरला टार्गेट केलंय. सोनम सुशांत सिंह राजपूत केसमधील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीला सपोर्ट करत आहे. याच सोनमला कंगनाने आता स्मॉल टाइम ड्रगी असं म्हटलं आहे. कंगनाने गुरूवारी ट्विट करत लिहिले की, 'माफिया बिंबोने अचानक माझ्या घराच्या तोडफोडीच्या माध्यमातून रियाजीसाठी न्यायाची मागणी सुरू केली आहे. माझी लढाई लोकांसाठी आहे. माझ्या संघर्षाची तुलना एका स्मॉल टाइम ड्रगीसोबत करू नये, जी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्टार बनलेल्या स्टारच्या तुकड्यांवर वाढत होती. असं करणं बंद करावं'.
सोनमवर कंगनाचा निशाणा
बीएमसी द्वारे बेकायदेशीर बांधकामाचा आरोप लावत कंगनाच्या ऑफिसची तोडफोड प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देत सोनमने ट्विट केलं होतं की, 'डोळ्याच्या बदल्यात डोळे याने संपूर्ण जग आंधळं होईल'. सोनम कपूरने अभिनेत्री दीया मिर्झाचं ट्विट रिट्विट करत आपलं मत व्यक्त केलं होतं. दीया मिर्झाने ट्विट केलं होतं की, 'कंगनाच्या ऑफिसमध्ये झालेल्या तोडफोडीचा निषेध करते. रियासोबत झालेल्या दुर्व्यवहाराचा निषेध करते. मी इथे कुणाची बाजू घेत नाहीये. जे सत्य आहे त्यावर माझं मत मांडत आहे. लक्षात ठेवा की, असं तुमच्यासोबतही होऊ शकतं'.
कंगनाची भगत सिंह यांच्याशी तुलना
अभिनेता-निर्माता विशाल म्हणाली की, 'प्रिय, कंगना तुझ्या हिंमतीला सलाम आहे. तू तुझा आवाज उठवताना हा विचार केला नाही की, काय चूक काय बरोबर आहे. हा तुझा व्यक्तिगत मुद्दा नव्हता. पण तरी सुद्धा सरकारच्या नाराजीचा सामना करत तू मजबूतपणे उभी राहिली. जे एक फार मोठं उदाहरण आहे. अशाच प्रकारचं काही १९२० मध्ये भगत सिंह यांनी केलं होतं'.
एका वक्तव्यामुळे पेटला होता वाद
मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राबाबत कंपनाने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ती म्हणाली होती की, तिला मुंबईत असुरक्षित वाटतं. मंबईची तुलना तिने पीओकेसोबत केली होती. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तिला मुंबईत परत येऊ नकोस असं बजावलं होतं. यानंतरच कंगनाने मुंबईची तुलना पीओकेसोबत केली होती. दरम्यान बीएमसीने बुधवारी अभिनेत्री कंगनाचं बांद्र्यातील ऑफिसमधील काही बेकायदेशी बांधकाम पाडलं होतं. ज्यानंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला होता.
कंगना विरोधात तक्रार दाखल
कंगनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा CM Uddhav Thackeray एकेरी उल्लेख करणं महागात पडणार आहे. याबाबत वकील नितीन माने यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल अभिनेत्री कंगना राणौतविरोधात तक्रार दाखल केली आहे. नितीन यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार नितीश माने यांनी कंगना हिने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे तुझे क्या लगता है! कि तुने फिल्म माफिया के साथ मिल के मेरा घर तोडकर बडा बदला लिया है असे बदनामीकारक व्हिडीओ अपलोड केला म्हणून तक्रार दाखल केली.
हे पण वाचा :
भेकड अन् घाबरट, कंगनाच्या आईचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
'माझी पण इच्छा आहे, माझ्या नावावर अशी बिल्डींग कुणीतरी करावी'
कंगना भाजपा किंवा रिपाईत आल्यास स्वागत; रामदास आठवलेंनी सांगितला चर्चेचा तपशील
'या' अभिनेत्याने 'भगत सिंह' यांच्याशी केली कंगनाची तुलना, वाचा नेमका काय म्हणाला!