खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. यामध्ये कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिकेत साकारत आहे. इंदिरा गांधींनी लावलेला इमर्जन्सीचा भयानक काळ सिनेमामध्ये दाखवण्यात आला आहे. तसंच अभिनेता श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत आहे तर अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारत आहेत. नुकतंच सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे.
'इमर्जन्सी' मधलं 'सिंहासन खाली करो' हे गाणं समोर आलं आहे. ट्रेलरनंतर या गाण्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. गाण्यालाही चाहत्यांची पसंती मिळाली आहे. 'सिंहासन खाली करो जनता आती है' असे गाण्याचे बोल आहेत. विरोधी पक्ष 'इमर्जन्सी' विरोधात जोशात आवाज उठवताना गाण्यात दिसत आहेत. तर कंगनाचा एकही डायलॉगही गाजत आहे.'जर मी त्यांच्या हक्कासाठी संपूर्ण जगाशी लढू शकते, तर माझ्या स्वत:च्या हक्कासाठी त्यांच्याशीही लढू शकते.' असं ती म्हणते.
'इमर्जन्सी' ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. सिनेमात सतीश कौशिक, मिलिंद सोमण, भूमिका चावला यांचीही भूमिका आहे. मिलिंद सोमणने सॅम माणिकशॉ यांची भूमिका साकारली आहे. सिनेमाच्या ट्रेलर आणि आता गाण्यानंतर प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी आतुर झालेत. कंगना सध्या अनेक मुलाखतींमधून सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे.