Join us

Kangana Ranaut : “तर गोळया घातल्या जातील...”, कंगनाच्या घराबाहेरच्या पाटीची सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 5:51 PM

Kangana Ranaut : कंगनाने एक व्हिडीओ तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओतील एका गोष्टीनं सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही गोष्ट कोणती तर कंगनाच्या घराबाहेर लागलेली पाटी. होय, सध्या त्याचीच जोरदार चर्चा आहे.

बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेली कंगना राणौत (Kangana Ranaut ) तिच्या सिनेमांपेक्षा वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या मात्र तिच्या मुंबईतील घराची चर्चा आहे. होय, सध्या कंगनाच्या मुंबईतील घराचं रिनोव्हेशन सुरू आहे. याचा एक व्हिडीओ कंगनाने तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओतील एका गोष्टीनं सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ही गोष्ट कोणती तर कंगनाच्या घराबाहेर लागलेली पाटी. होय, सध्या त्याचीच जोरदार चर्चा आहे.

"No trespassing. Violators will be shot. Survivors will be shot again!" ( घुसखोरी करण्यास सक्त मनाई, घुसखोरांना गोळ्या घालून ठार करण्यात येईल आणि जे बचावतील त्यांना पुन्हा गोळ्या घालण्यात येतील.) असं या पाटीवर ठळकपणे लिहिलं आहे. तिच्या घराबाहेरच्या अजब गजब पाटीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळतेय.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती चंद्रमुखी २ या सिनेमात झळकणार आहे. याशिवाय इमर्जन्सी हा तिचा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीस येतो. नुकतंच कंगनाने ‘चंद्रमुखी २’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. कंगनाच्या या सिनेमाचा प्रीक्वेल २००५ रोजी रिलीज झाला होता. यात सुपरस्टार रजनीकांत व ज्योतिका सरवनन लीड रोलमध्ये होते. चंद्रमुखी हा मणिचित्राथझु या मल्याळम सिनेमाचा रिमेक होता. हिंदीतही याचा रिमेक बनवला गेला होता. यात अक्षय कुमार लीड रोलमध्ये होता. आता ‘चंद्रमुखी २’मध्ये कंगना लीड रोल साकारताना दिसणार आहे. कंगनाच्या ‘इमर्जन्सि’ या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत. यात कंगनाने इंदिरा गांधी यांचा प्रवास उलगडून सांगितला आहे. हा सिनेमा स्वत: कंगनाने दिग्दर्शित केला आहे.

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूड