Join us

Laal Singh Chaddha : आमिर खान हाच खरा ‘मास्टर माइंड’, त्यानेच सुरू केला वाद..., कंगना राणौतचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 4:27 PM

Laal Singh Chaddha, Kangana Ranaut : आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’या सिनेमाला रिलीजआधीच जोरदार विरोध होतोय. या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता या मुद्यावर कंगना राणौतने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 आमिर खानच्या (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या सिनेमाला रिलीजआधीच जोरदार विरोध होतोय. सिनेमा 11 ऑगस्टला रिलीज होतोय. पण त्याआधी आमिरच्या या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ट्विटरवर  #BoycottLalSinghChadha ट्रेंड करत आहेत. कारण काय तर आमिरची काही जुनी वादग्रस्त वक्तव्ये. भूतकाळातील काही चुकीची विधानं आमिरला आत्ता महाग पडताना दिसत आहेत. याचमुळे नेटकरी त्याच्या या आगामी सिनेमावर बहिष्कार टाकण्याची भाषा करत आहेत. आमिरने यावर स्पष्टीकरण दिलं खरं, पण त्यामुळेही नेटकऱ्यांचा राग शांत झालेला नाही. अशात आता या मुद्यावर कंगना राणौतने (Kangana Ranaut)आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या मते,  #BoycottLalSinghChadha वादाचा मास्टर माइंड अन्य कुणी नसून स्वत: आमिर खान आहे. आमिरने जाणीवपूर्वक रिलीजआधी या वादाला हवा दिली, असा दावा तिने केला आहे.

कंगनाने यासंदर्भात एक इन्स्टाटोरी शेअर केली आहे. यात ती म्हणते, ‘माझ्या मते, आगामी लाल सिंग चड्ढा या सिनेमाबद्दल जितक्या काही निगेटीव्ह गोष्टी होत आहेत, त्या सर्वांचा मास्टर माइंड आमिर खान आहे. यावर्षी एक कॉमेडी चित्रपटाचा सीक्वल वगळता एकही सिनेमा हिट झालेला नाही. फक्त भारतीय संस्कृती दर्शवणारे साऊथचे सिनेमे किंवा मग लोकल फ्लेवर चित्रपट चांगले प्रदर्शन करत आहेत. एका हॉलिवूड सिनेमाचा रिमेक तसाही फार चांगली कामगिरी करणार नाहीच. म्हणून मग ते भारताला असहिष्णू म्हणतात... हिंदी फिल्ममेकर्सला प्रेक्षकांची नस ओळखण्याची गरज आहे. हे हिंदू-मुस्लिमांबद्दल नाहीये. आमिरने हिंदूफोबिक पीके बनवला, भारताना असहिष्णू म्हटलं आणि तरिही आपल्या आयुष्यात अनेक हिट सिनेमे दिलेत. त्यामुळे कृपया याला धर्म वा विचारधारेशी जोडणं बंद करा. हे त्याचा खराब अभिनय वा खराब चित्रपटांपेक्षा वेगळं आहे..., असं मत कंगनाने व्यक्त केलं आहे.

टॅग्स :कंगना राणौतआमिर खानलाल सिंग चड्ढा