Join us

"संपूर्ण सिनेमात ती फक्त तयारच होतीये...", कंगना राणौतला 'पद्मावत'ची मिळाली होती ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:58 IST

कंगनाचा संजय लीला भन्साळींवर निशाणा

अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. नुकताच तिचा 'इमर्जन्सी' सिनेमा रिलीज झाला आहे. यामध्ये तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. सिनेमानिमित्त तिने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. कंगनाला 'पद्मावत' सिनेमा ऑफर झाला होता असा खुलासा तिने एका मुलाखतीत केला. विशेष म्हणजे तिने अगदी एका वाक्यात 'पद्मावत' सिनेमातील दीपिका पदुकोणच्या भूमिकेलाच ट्रोल केलं. ते कसं वाचा.

अजीत भारतीला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, "जर तुम्ही आघाडीचे सिनेमे घेतले तर अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्रीची भूमिका ही फारच कमी असते. मला अनेक मोठे सिनेमे ऑफर झाले होते. काही सिनेमात तर khans' ही होते. पण माझी भूमिका अगदीच १०-१५ मिनिटांची आणि तेही अपमानजनक. ते महिलांना चांगलं दाखवतच नाहीत."

संजय लीला भन्साळींचं नाव न घेता ती पुढे म्हणाली, "एका बड्या दिग्दर्शकाचंच उदाहरण आहे. त्यांनी हीरामंडी, बाजीराव मस्तानीसोबतच वेश्यांचं अख्खं जगच निर्माण केलं आहे. महिला आणखीही वेगळी काम करतातच की. हे फारच त्रास देणारं आहे. मी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना कमी लेखत नाहीए मी स्वत: रज्जो ही सेक्स वर्करची भूमिका निभावली होती. मला पद्मावतसाठी विचारलं गेलं होतं. मी त्यांना स्क्रीप्ट मागितली. तर ते म्हणाले, 'मी स्क्रिप्ट कधीच देत नाही'. मी म्हटलं,'मग भूमिका नक्की काय आहे?' ते म्हणाले,'हिरो हिरोईनला आरश्यात तयार होताना पाहून घायाळ होतो.' जेव्हा मी नंतर सिनेमा पाहिला तेव्हा मला जाणीव झाली की खरोखरंच संपूर्ण सिनेमात दीपिका फक्त तयारच होत आहे. म्हणजे ते खरंच बोलत होते. मला अशा लोकांवर बोलून त्यांचं लक्ष वेधून घ्यायचं नाही. पण तुम्हीच सांगा मी कोणत्या दिग्दर्शकाबरोबर काम केलं पाहिजे." 

टॅग्स :कंगना राणौतदीपिका पादुकोणबॉलिवूड