Join us

विरोधकांना कंगनाने दिलं फिल्मी स्टाइल उत्तर, म्हणाली - '...तर ७२ देशांचे पोलीस माझ्या मागावर असते'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 9:52 AM

पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांजने यावर कंगनाची चांगलीच शाळा घेतली आणि दोघांमध्ये ट्विटर वॉर बघायला मिळालं. नंतर कंगनाला ते ट्विट डिलीट करावं लागलं होतं.

कंगना रणौतचं कशावरही वक्तव्य करणं आणि त्यावरून वाद होणं हे काही आता कुणाला नवीन राहिलेलं नाही. जेव्हापासून ती ट्विरवर आली आहे तेव्हापासून एकापाठी एक वाद सुरूच आहेत. कंगनाने शेतकरी आंदोलनासंबंधी अनेक ट्विट्स केलेत. यादरम्यान एका वयोवृद्ध महिलेबाबत अपशब्द वापरणं कंगनाला चांगलंच महागात पडलं आहे. पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांजने यावर कंगनाची चांगलीच शाळा घेतली आणि दोघांमध्ये ट्विटर वॉर बघायला मिळालं. नंतर कंगनाला ते ट्विट डिलीट करावं लागलं होतं. आता कंगनाने त्याच्या टिकाकारांवर निशाणा साधणारं ट्विट कलं आहे. 

कंगनाने तिच्या सपोर्टरकडून करण्यात आलेल्या ट्विटला उत्तर देत लिहिले की, 'तुम्ही काय म्हणताय? मी सध्या या देशातील हॉटेस्ट टार्गेट आहे. माझ्यावर निशाणा साधा आणि मीडियाचे लाडके व्हा. मूव्ही माफिया द्वारे तुम्हाला रोल ऑफर केले जातील. तुम्हाला सिनेमात काम दिलं जाईल. तुम्हाला फिल्मफेअर अवॉर्ड मिळणार आणि शिवसेनेचं तिकीटही मिळणार. जर मी डॉन असती तर तुम्हाला माहीत आहेच. ७२ देशांचे पोलीस माझ्या मागावर असते'.

दरम्यान, गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर कंगनावर सगळीकडून टीका होत आहे आणि दिलजीत लोकांच्या नजरेत हिरो बनला आहे. इतकेच नाही तर त्याने शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १ कोटी रूपये सुद्धा दिले आहेत.

कृषी विधेयक २०२० बाबत पंजाब आणि हरयाणातील शेतकरी आंदोलन सुरूच आहे. हे विधेयक मागे घेण्याची मागणी ते सरकारकडे करत आहेत. शेतकरी याच मागणीवर अडून बसले आहेत आणि सरकार बोलणी करून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. जगभरात या आंदोलनाची माहिती पोहोचली असून यावर चर्चा होत आहे. आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की, सरकार यावर काय निर्णय घेणार आहे. 

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूड