Join us

नाव न घेता कंगनाने उडवली आलिया अन् करण जोहरची खिल्ली, वाचा काय म्हणाली ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 1:11 PM

बॉलिवूडची क्वीन अशी ओळख असलेली कंगना ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते.

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) हिने अनेक उत्कृष्ट सिनेमांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडची क्वीन अशी ओळख असलेली कंगना ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्यासाठी असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला आहे. 

कंगना हिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. त्या तिने लिहले, "जेव्हा तुम्ही स्त्रीकेंद्रित चित्रपटाचा नाश करता आणि तो चालणार नाही याची खात्री करता. तेव्हा ते चालत  नाही... मग ते तुम्ही बनवले तरीही काम चालत नाहीत. धन्यवाद". नेटकऱ्यांच्या मते कंगनाने  या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी तिच्या या पोस्टचे लक्ष्य करण जोहर, आलिया भट आणि त्यांचा 'जिगरा' चित्रपटावर असल्याचं बोललं जात आहे.  'थलाईवी', 'धाकड' आणि 'तेजस' सारखे महिला केंद्रित चित्रपट करण जोहरमुळे चालले नाहीत, असे यातून तिने दर्शवले आहे. 

दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आणि कंगना राणौत  यांच्यातील वाद जगप्रसिद्ध आहे. कंगना ही करणवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. ती बर्‍याच दिवसांपासून करण जोहर याच्यावर, त्याच्या चित्रपटातून (तो) घराणेशाहीला प्रोत्साहन (Nepotism) देत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, 'जिगरा'बद्दल बोलायचं झालं तर हा भाऊ-बहिणीच्या नात्यावरील सिनेमा आहे. आलियाने करण जोहरसोबत मिळून सिनेमाची निर्मितीही केली आहे. 

टॅग्स :कंगना राणौतकरण जोहरआलिया भट