अभिनेत्री कंगना रणौत जेव्हापासून ट्विटरवर आली तेव्हापासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. सुशांतसाठी न्यायाची मागणी असो वा महाराष्ट्र सरकारवर टीका असो, अशा कित्येक कॉन्ट्रोवर्सीजमुळे ती चर्चेत आहे. अशात कंगनाने तिच्या परिवाराबाबतच्या पोस्ट आणि बालपणीच्या आठवणी शेअर करत आहे. कंगना ट्विटरवर नुकतीच एक पोस्ट केली असून त्यात तिने सांगितले की, बालपणी कशाप्रकारे लोक तिच्यावर हसत होते.
कंगनाने लिहिले की, 'जेव्हा मी लहान होते तेव्हा मी स्वत:ला मोत्यांनी सजवत होते. स्वत:चे केस स्वत: कापत होते, मांड्यांपर्यंत लांब सॉक्स आणि हील्स घालत होते. तेव्हा लोक माझ्यावर हसत होते. गावातील जोकर होण्यापासून ते लंडन, पॅरिस, न्यूसॉर्क फॅशन वीकच्या फ्रन्ट रोमध्ये बसण्यापर्यंत मला असं जाणवलं की फॅशन काहीच नाही बस स्वत:ला एक्सप्रेस करण्याची पद्धत आहे'.
कंगनाने या पोस्टसोबत ३ फोटो शेअर केले आहेत. यात एक तिचा बालपणीचा फोटो आहे. यात ती सजून कॅमेराला पोज देत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती फॅशन शोमध्ये फ्रन्ट रोमध्ये बसलेली आहे.
कंगनाने याआधी तिच्या भावाचा फोटोही शेअर केला होता. तिने लिहिले होते की, असं वाटतं तिघेही एकाच चेतनेचा भाग आहेत. दरम्यान कंगनाचा बीएमसीसोबत वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाच्या पाली हीलमधील ऑफिसचं बेकायदेशीर बांधकाम बीएमसीने पाडलं होतं. हे प्रकरण आता कोर्टात आहे.
कोर्टाने संजय राऊतांना सुनावलं...
दरम्यानअभिनेत्री कंगना राणौत प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना नेते संजय राऊत यांना सुनावलं आहे. कंगनाला कोणतीच धमकी दिली नसल्याचं राऊत यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. इतकचं नाही तर ती खोटं बोलतेय असंही राऊत म्हणाले. त्यावर कोर्टाने कंगनाच्या विधानाशी आम्ही सहमत नाही परंतु ही बोलण्याची पद्धत आहे का? असा सवाल न्यायाधीशांनी संजय राऊत यांना विचारला.
एका मुलाखतीत संजय राऊत कंगना राणौतबद्दल जे बोलले त्याचा हवाला देत कोर्टात न्यायाधीश म्हणाले की, आम्हाला सर्वांना महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान आहे. पण आम्ही जाऊन कोणाचं घर तोडत नाही. प्रतिक्रिया देण्याचा हा मार्ग आहे का? अशा प्रकारे विधान करणे तुम्हाला योग्य वाटते काय? तुम्ही महाराष्ट्राचे एक मोठे नेते आहात आणि जर आपण असे विधान केले तर ते अजिबात योग्य नाही. महाराष्ट्रीयन असल्याने तुम्हाला मोठेपणा दाखवायला हवा होता अशा शब्दात कोर्टाने फटकारलं, त्यावर संजय राऊत यांचे वकील म्हणाले की, हो वादविवाद टाळता आला असता आणि शब्दांच्या वापरावर लक्ष देऊ शकतो.
कंगनाच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, बीएमसी जी माहिती देत होती, ती बरोबर नाही कारण जानेवारीपर्यंत कंगनाच्या कार्यालयाचे बांधकाम पूर्ण झाले होते. बीएमसीचे म्हणणे आहे की, कंगनाने शौचालयाचे खोलीत रुपांतर केले. त्यात काय चूक आहे आणि बेकायदेशीर बांधकाम कसे केले गेले? आणि जे बदल केले त्याला नियमित केले जाऊ शकत होते, या प्रकरणाची सुनावणी आता ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.