ऐश्वर्या राय आणि सलमान खानची खिल्ली उडवणारे मीम शेअर करून विवेक ओबेरॉय पुरता फसला. बॉलिवूड कलाकारांचे टीकास्त्र आणि राष्ट्रीय महिला आयोगाने बजावलेले नोटीस या सगळ्यानंतर विवेक नरमला आणि झालेल्या प्रकाराबद्दल त्याने माफी मागितली. या संपूर्ण प्रकरणात विवेक ओबेरॉयवर चहूबाजंूनी टीकेची झोड उठली. पण याचदरम्यान एक महिला मात्र विवेकच्या बाजूने उभी झालेली दिसली. ती म्हणजे, कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल. रंगोलीने ट्वीटरवर या संपूर्ण प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपली भडास काढली. केवळ इतकेच नाही राष्ट्रीय महिला आयोगाला ‘फ्रॉड’ म्हणून मोकळी झाली.
विवेकच्या ट्वीटमध्ये काय होते? विवेकने आपल्या सोशल अकाऊंटवर एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवरचे एक मीम्स शेअर केले होते. पण त्याचे हे ट्वीट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण हे ट्वीट आणि हे मीम शेअर करताना त्याने केवळ एक्झिट पोलचीच नाही तर ऐश्वर्या राय बच्चन हिचीही खिल्ली उडवली होती. विवेकने ट्वीट केलेल्या मीम्समध्ये तीन फोटो होते. यातील पहिल्या सर्वात वरच्या फोटोत सलमान खान आणि ऐश्वर्या राय होते. या फोटोला ‘ओपिनियन पोल’ असे कॅप्शन देण्यात आले आहे होते. दुस-या फोटोत ऐश्वर्या विवेक ओबेरॉयसोबत होते. याला ‘एक्झिट पोल’ असे लिहिलेले होते. तिस-या फोटोत ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन व आराध्याचा फोटो होता आणि यावर ‘रिझल्ट’ असे लिहिले होते.