Join us

Kangana Ranaut SITA Movie: कंगनाच्या 'सीता'मध्ये विक्रम साकारणार भगवान रामाची भूमिका; दिग्दर्शकाने घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 7:34 PM

Kangana Ranaut SITA Movie: कंगना रनौतचा रामायणावर आदारित चित्रपट 'सीता: द इनकार्नेशन' गेल्या वर्षी अनाउंस झाला होता.

Kangana Ranaut SITA Movie: तामिळ अभिनेता चिया विक्रम (Vikram) सर्वांच्याच परिचयाचा आहे. 'अपरिचीत', 'आय' यांसारख्या चित्रपटामुळे दक्षिणसोबत उत्तर भारतात विक्रमचा चाहता वर्ग मोठा आहे. सध्या विक्रम त्याच्या 'पोन्नियिन सेल्वन'(PS-1) चित्रपटामुळे चर्चेत आहे. मणिरत्नम यांच्या या पीरियड ड्रामामध्ये विक्रमने चोल युवराज आदित्य करिकालनचे पात्र साकारले आहे. त्याच्या अभिनयाचे सध्या जोरदार कौतुक होत आहे.

कंगनाच्या चित्रपटात विक्रम श्रीरामाच्या भूमिकेत?विक्रमने चित्रपटातील अभिनयासोबतच प्रमोशनदरम्यान भारतीय संस्कृती आणि इतिहासावर दिलेल्या भाषणाची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, आता काही मीडिया रिपोर्ट्समधून दावा करण्यात येतोय की, विक्रम लवकरच प्रभू श्री रामांची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) रामायणवर आधारित चित्रपट 'सीता: द इनकार्नेशन' गेल्या वर्षी अनाउंस झाला होता. यात कंगना माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. यात विक्रम श्रीरामांची भूमिका साकारू शकतो.

दिग्दर्शकाने घेतली विक्रमची भेटहा चित्रपट सीतेच्या नजरेतून बनवण्यात येणार आहे. मेकर्सचा दावा आहे की, या चित्रपटात मोठ्या प्रमाणात स्पेशल इफेक्ट्स असतील. दरम्यान, 'सीता: द इनकार्नेशन'चे दिग्दर्शक अलौकिक देसाईने काही दिवसांपूर्वीच विक्रमची भेट घेतली. तेव्हापासूनच विक्रमची चित्रपटात एन्ट्री झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. अलौकिकने विक्रमसोबत झालेल्या भेटीचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.यापूर्वीही साकारली रामावर आधारित भूमिकाविक्रमने 'सीता: द इनकार्नेशन'मध्ये श्रीरामाची भूमिका साकारण्यास होकार दिला, तर ही पहिलीच वेळ नसेल. कारण, PS-1चे डायरेक्टर मणिरत्नम यांच्या 'रावण' चित्रपटात चियान विक्रमने कॉप देव प्रतापची भूमिका साकारली होती. हे पात्र भगवान रामावरच आधारित होते. 'रावण' मणिरत्नम यांचा रामायणवर एक मॉडर्न टेक होता. त्या चित्रपटातील विक्रमच्या पात्राचे खुप कौतुक झाले होते.

'बाहुबली'च्या लेखकांनी लिहिली 'सीता'ची स्टोरी'सीता: द इनकार्नेशन'चे डायरेक्टर अलौकिक देसाई आहेत, तर केव्ही विजयेंद्र प्रसाद चित्रपटाची पटकथा लिहित आहेत. केव्ही विरजयेंद्र प्रसाद दिग्दर्शक एसएस राजामौलींचे वडील आणि 'बाहुबली', RRR सारख्या हीट चित्रपटाचे लेखकदेखील आहेत. सगळं काही ठीक झालं, तर लवकरच आपल्याला विक्रम आणि कंगनाची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडरामायण