दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत केसमध्ये कंगना रणौतने जेव्हा आपली वादग्रस्त विधाने सुरू केली तेव्हा केसमध्ये पूर्णपणे नवीन वळण आलं. कंगनाने बॉलिवूडमधील ड्रग्सवर जोर दिला आणि इंडस्ट्रीतील स्टार्सची टेस्ट करण्याची मागणी केली. तसेच बीएमसी आणि राज्य सरकारवरही तिने वार केले. हा वाद इतका वाढला की, कंगनाच्या ऑफिसवर बीएमसीने बुलडोजर चालवला.
मुंबईत पोहोचल्यावर कंगनाने एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री मीना कुमारी यांचं नाव घेत म्हणाली की, त्यांचा हलाला झाला होता. कंगना द्वारे मीना कुमारी यांच्यावर करण्यात आलेल्या या वक्तव्यावर मीना कुमारी यांचा ताजदार अमरोही भडकले आहेत. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कंगनावर आपला राग व्यक्त केलाय.
ताजदार म्हणाले की, 'आम्ही त्या परिवारातील आहोत ज्यात माझी लहान आई वडिलांपासून वेगळी राहत होती. अर्थात ती नाराज होती. पण कधीही कोणत्या प्रकारची तक्रार केली नाही. माझे वडील कमाल अमरोही हे सुद्धा गप्प होते. परिवारातील समस्या अशाच सोडवल्या जातात. हे वडील आणि आईचं प्रेम होतं. जे एकमेकांपासून वेगळे राहून एकमेकांचा सन्मान करत होते. आधी आई मीना कुमारी यांचं निधन झालं. नंतर वडिलांचं. दोघांच्या कबरी आजूबाजूला आहे. याला तुम्ही काय म्हणाल'.
'आमच्या परिरासाठी मीना कुमारी यांची एक गुडविल आहे. त्यांचा सन्मान आहे आणि कंगनासारखी मूर्ख मुलगी आमच्या परिवारावर चिखलफेक करत आहे'. कंगना एका मुलाखतीत म्हणाली होती की, मीना कुमारी यांचा हलाला झाला होता. या मूर्ख मुलीला हे सुद्धा माहीत नाही की, लहान आई एक शिया मुस्लिम होती. वडिलडी एक शिया मुस्लिमच होते. शिया मुस्लिमांमध्ये हलालासारखी कोणतीही गोष्ट होत नाही'.
कंगनाने अशा कमेंट करू नये
'आता जेव्हा कंगना एका टीव्ही चॅनलवर मीना कुमारींचा हलाला झाला असं म्हणते तेव्हा लोकांना वाटतं की, तिने माहिती काढून हे सांगितलं असेल. अशात आम्ही आतापर्यंत जे लोकांना सांगितलं ते पुसलं जाऊ शकतं. माझ्या आई-वडिलांच्या नात्यावर कंगनाने जो आघात केलाय तो वाईट आहे. कंगनाने अमरोही परिवाराची माफी मागायला पाहिजे. तेव्हाच लोकांमधील गैरसमज दूर होईल'.
अशिक्षित, गावंढळ आहे कंगना
'मला या गोष्टींना हवा द्यायची नव्हती. त्यामुळे मी तेव्हा काहीही बोललो नाही. पण जेव्हा कंगनाची मुलाखत सोशल मीडियावर पुन्हा पुन्हा दिसू लागली तेव्हा लोकांमध्ये गैरसमज परतो. कंगना रणौत फारच अडानी आहे. शिकलेली तर काही नाही. आता जी मुलगी १५ वयाची असताना घर सोडते ती शिकली तर नसणारच. शिकण्याच्या वयात ती मुंबईत आली होती. आता शिकलेलीच नाही तर मी काही अॅक्शन घेणार नाही. शिकलेली असती तर मानहानीचा दावा ठोकला असता. ती केवळ महिला कार्ड खेळून पुन्हा पुन्हा प्रकाशझोतात येते'.
कंगना-उर्मिला वादात सनीची एंट्री, पॉर्न स्टार कमेंटवरुन लगावला टोला
'रुदाली' म्हटल्याने वाईट वाटलं असेल तर मी कंगनाची माफी मागायला तयार' - उर्मिला मातोंडकर
'भांडणाची सुरूवात मी करत नाही, पण संपवते मीच', कंगना रणौतचा शिवसेनेला इशारा?
अनुराग-कंगनात पेटलं ट्विटर वॉर, म्हणाली - इतका मंदबुद्धी कधीपासून झालास...