Join us

लग्नात परफॉर्म करणाऱ्या स्टार्सवर कंगानाने साधला निशाणा, म्हणाली - 'पैसा आणि प्रसिद्धीसाठी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 16:48 IST

बॉलिवूडची क्विन कंगना रणौतनं एक पोस्ट शेअर केली आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं प्री-वेडिंग फंक्शन सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. या ग्रँड प्री-वेडिंग फंक्शनला हजेरी लावण्यासाठी जगभरातून स्टार्स मंडळी जामनगरला पोहोचले. बॉलिवूडच्या अनेक कलकारांनी परफॉर्मन्स दिला. आता यातचं बॉलिवूडची क्विन कंगना रणौतनं एक पोस्ट शेअर केली आहे. कंगनाने कुणाचेही नाव न घेता वेडिंग फंक्शन्समध्ये परफॉर्मन्स देणाऱ्या कलाकरांवर निशाणा साधला आहे. 

कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहेत. त्यात तिनं लता मंगेशकर यांनी 'लग्नात परफॉर्म करण्यास नकार दिला होता' अशी माहिती सांगणारा एक लेख शेअर केला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'मला पाच लाख डॉलर दिले तरी मी येणार नाही. मी खूप साऱ्या बिकट आर्थिक परिस्थितीला सामोरी गेली आहे. मात्र आता मी आणि लताजी आम्ही दोघी अशा सेलिब्रेटी आहोत ज्यांची सगळी गाणी लोकप्रिय झाली आहेत'.

कंगनानं लिहलं, 'फॅशन का जलवा, घनी बावली हो गई, लंडन ठुमकदा, साडी गली,विजय भव हे गाणे लोकप्रिय झाले. मला परफॉर्म करण्यासाठी अनेक ऑफर्स आल्या. पण, मी कधीही दुसऱ्यांच्या लग्नात नाचले नाही. कित्येकदा सुपरहिट आयटम साँग देखील मला ऑफर करण्यात आले होते. पण मी ते केले नाही. कारण प्रसिद्धी आणि पैसा नाकारण्यासाठी शुद्ध चारित्र्य आणि अभिमान लागतो. सर्वात मोठं धन हे ईमानदारी आहे, हे युवा पिढीनं समजायला हवं'. कंगनाने या पोस्टमध्ये कुणाचंही नाव घेतलेलं नाही. पण, तिनं अप्रत्यक्षपणे जामनगरला पोहचलेल्या बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.  

टॅग्स :कंगना राणौतसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा