कंगना रणौत तिच्या वादग्रस्त बडबडीमुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत केसमध्ये तिने बॉलिवूडमधील लोकांवर अनेक आरोप केले आहेत. इतकेच काय तर अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनाही तिने उलट उत्तर दिलंय. आता पुन्हा एकदा टाइम्स नाउसोबत बोलताना कंगनाने सारा अली खानच्या रिलेशनशिपबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
कंगना टाइम्स नाउसोबत बोलताना म्हणाली की, 'जे मुव्ही माफिया आहेत, ज्यांनी सुशांतला त्रास दिला. त्याला बॅन केलं...मी त्यांच्याबाबत स्पष्टपणे बोलली आहे. जे प्रॉडक्शन हाऊस आहेत, ज्यांनी सुशांतला टार्गेट केलं. त्यांनीच त्याला बॅन केलं. त्यांना फॉलो करणाऱ्या मीडियाने सुशांतच्या कॅरेक्टरवर हल्ला केला. त्याला रेपिस्ट म्हटलं. त्याला एकाएकी कॉर्नर केलं'. कंगना म्हणाली की, याच सुसाइड गॅंगने तिला सुद्धा टार्गेट केलं होतं.
कंगना पुढे म्हणाली की, 'जेव्हा तो(सुशांत) सारा अली खानला डेट करत होता तेव्हा या लोकांना हेच वाटत होतं की, त्यांचं ब्रेकअप व्हावं'. कंगनाने करीना कपूरचं नाव घेत सांगितलं की, 'करीना म्हणाली सुद्धा होती की, आपल्या पहिल्या हिरोला (सुशांत) डेट करू नको प्लीज'.
सुशांत सिंह राजपूत केसवर कंगना म्हणाली की, 'आपण सगळ्यांनी हे पाहिलंय की, कशाप्रकारे सुशांतच्या वडिलांनी पोलिसांच्या कमतरतेंची तक्रार केली. मी ड्रग रॅकेटचा भांडाफोड केला आणि मी घाबरलेली होते. म्हणून मी केंद्राकडे सुरक्षेची मागणी केली. मी मराठ्यांबाबत काहीच म्हणाले नाही. राजकीय पक्षांनी इंडस्ट्रीतील काही लोकांशी हातमिळवणी केली आहे. मला सुरक्षा मिळाली नसती तर साधुंसारखी मी सुद्धा मारले गेले असते'.
जया बच्चन यांना कंगनाचं प्रत्युत्तर
जया बच्चन यांनी संसदेत केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देताना केलेल्या टिष्ट्वटमध्ये कंगनाने म्हटले आहे की, ‘जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने आम्हाला कोणती थाळी दिली? एक थाळी मिळाली होती ज्यात दोन मिनिटांचे रोल, आयटम साँग आणि एक रोमँटिक सीन असायचा. ते सुद्धा अभिनेत्यासोबत शय्यासोबत केल्यानंतर. या इंडस्ट्रीला मी फेमिनिझम शिकवली. देशभक्ती आणि महिला केंद्रित चित्रपटांनी मी ती थाळी सजवली आहे. ही माझी स्वत:ची थाळी आहे जयाजी, तुमची नाही!’ कंगनाच्या या टिष्ट्वटनंतर आरोप-प्रत्यारोपांची राळ उठल्याने बच्चन कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. खा, हेमामालिनी यांनीही बॉलीवुडची बदनामी केली जात असल्याचे म्हटले आहे.
स्वरा भास्करने घेतली कंगनाची शाळा
अभिनेत्री स्वरा भास्करने कंगनाला लाजिरवाणी विधाने थांबविण्याचे आवाहन केले. कंगनाने तिच्या विचारांची घाण स्वत:कडेच ठेवावी. शिव्याच द्यायच्या असतील तर मला द्याव्यात. तुझी ही बडबड मी आनंदाने ऐकेन आणि खुशाल तुझ्यासोबत चिखलातली कुस्ती खेळेन. मोठ्यांचा आदर करणे ही भारतीय संस्कृतीची पहिली शिकवण आहे आणि तू तर कथित राष्ट्रवादी आहेस, असे ती म्हणाली.
सुशांतच्या 'त्या' १५ कोटी रुपयांचा लवकरच होणार उलगडा, CBIच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे
सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध, नितेश राणेंनी लिहिले अमित शहांना पत्र
बॉलीवूडमध्ये अमली पदार्थ आणि शय्यासोबतही!, कंगनाने केला नवा आरोप