१० ऑक्टोबरला वर्ल्ड मेंटल हेल्थ डे निमित्ताने जगभरात जनजागृती केली जाते. पण या निमित्ताने कंगना रणौतने सोशल मीडियावर नाव घेता दीपिका पादुकोणवर निशाना साधला आहे. कंगनाने ट्विट करत आपल्या फॅन्सना 'जजमेंटल है क्या' सिनेमा बघण्याची अपील केली. तेच दीपिकाबाबत तिने नाव न घेता लिहिले की, 'ते जे डिप्रेशनची दुकान चालवतात'.
आपल्या ट्विटमध्ये कंगनाने लिहिले की, 'मेंटल हेल्थ अवेअरनेससाठी आम्ही जो सिनेमा बनवला होता, त्याला त्या लोकांनी कोर्टात खेचलं जे डिप्रेशनचं दुकान चालवतात. मीडिया बॅननंतर सिनेमाचं नाव बदलण्यात आलं. ज्यामुळे या सिनेमाच्या मार्केटींगवर प्रभाव पडला. पण हा एक चांगला सिनेमा आहे आणि तो आजच बघा'. ( अभिनय चांगला करते, तिने तेच केले तर उत्तम...! शबाना आझमींचा कंगना राणौतला सल्ला)
दीपिका पादुकोण मेंटल हेल्थबाबत बरीच चर्चा करते. ती अनेकदा पब्लिक प्लॅटफॉर्मवर तिच्या डिप्रेशनच्या समस्येबाबत बोलली आहे आणि सोबतच ती सोशल मीडियावर मेंटल हेल्थ अवेअरनेसबाबत सतत काहीना काही लिहित असते. काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोणने डिप्रेशनवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यावर कंगनाने त्याच भाषेत उत्तर देत दीपिकावर निशाणा साधला होता. (थलायवीच्या सेटवरचे कंगना राणौतचे फोटो आले समोर, दिवंगत मुख्यमंत्री जयललितांच्या गेटअपमध्ये दिसली अभिनेत्री)
दरम्यान, प्रकाश कोवेलामुडीच्या दिग्दर्शनात बनलेल्या 'जजमेंटल है क्या' सिनेमात कंगना रणौत आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका होत्या. तसेच जिमी शेरगील, अमायरा दस्तूर आणि अमृता पूरी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका होत्या. आधी या सिनेमाचं नाव 'मेंटल है क्या' असं होतं. पण काही सामाजिक संघटनांनी याला विरोध केला आणि नंतर सिनेमाचं नाव बदलण्यात आलं.