कंगना रणौत आणि दिलजीत यांच्यातील ट्विटर वॉरने पुन्हा जोर धरला आहे. अभिनेत्री कंगना रणौतने दिलजीत दोसांजवर शेतकरी आंदोलनाच्या मधेच परदेशात सुट्टी एन्जॉय करण्याचा आरोप लावला आहे. दिलजीतने नुकतेच सुट्टी एन्जॉय करतानाचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले होते. त्यावरून कंगनाने त्याच्यावर निशाणा साधला होता. आता दिलजीतने कंगनाला यावरून सणसणीत उत्तर दिलं आहे.
कंगनाने दिलजीतवर निशाणा साधत लिहिले होते की, वाह माझ्या भावा! देशात आग लावून, शेतकऱ्यांना रस्त्यावर बसवून लोकल क्रांतिकारी परदेशात थंडीचा आनंद घेत आहे. वाह! याला म्हणतात लोकल क्रांतिकारी'. कंगनाच्या या टिकेवर दिलजीतने उत्तर दिले की, 'मला हे समजत नाही की, हिला शेतकऱ्यांशी काय समस्या आहे? मॅडम जी, पूर्ण पंजाब शेतकऱ्यांसोबत आहे. तू ट्विटरवर जीवन जगत आहेस. तुम्हाला तर कुणी काही विचारतही नाहीये'.
यानंतर कंगनाने दिलजीतला उत्तर दिलं की, 'वेळ सांगेल मित्रा, कोण शेतकऱ्यांसाठी लढलं आणि कोण त्यांच्या विरोधात. शंभर खोटे एक सत्य लपवू शकत नाही आणि ज्यांच्यावर खऱ्या मनाने प्रेम कराल, ते तुमचा कधीही द्वेष करू शकत नाहीत. तुला काय वाटतं. तुझ्या सांगण्यावरून पंजाब माझ्या विरोधात होईल? हाहा...इतकी मोठी स्वप्ने बघू नकोस. तुझं मन तुटेल'.
यावर दिलजीतने जराही वेळ न घालवता कंगनाला उत्तर दिलं. तो म्हणाला, 'मी हीला माझ्या पीआरसाठी का ठेवू नाही? हिच्या डोक्यातून तर मी जातच नाहीये...त्यानंतर त्याने एक पोस्ट शेअर केली. ज्यात त्याने लिहिले की, 'शेतकरी लहान मुलं नाहीत जे तुझं-माझं ऐकून रस्त्यावर बसले आहेत. सगळा दिवस मलाच बघत असतेस. या प्रश्नांचं उत्तरही घ्यायचं आहे पंजाब्यांनी. असं नको समजू आम्ही विसरलो'.