मागील काही वर्षांपासून लेखक-गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्यामध्ये कायदेशीर लढाई सुरु आहे. जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात फैजदारी खटला दाखल केला आहे. त्यामुळे नुकतीच या प्रकरणाची सुनावणी अंधेरी कोर्टात झाली. यावेळी कंगनाने धक्कादायक विधान केलं. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर माझ्याही मनात आत्महत्येचा विचार आला होता असं कंगनाने म्हटलं आहे.
'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, कंगनाने कोर्टामध्ये सुशांत सिंह राजपूत याचा उल्लेख करत इंडस्ट्रीमध्ये बाहेरच्या लोकांना खूप त्रास दिला जातो असं म्हटलं. इतकंच नाही तर आऊट साइडरला छळलं जातं असंही तिने म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाली कंगना?
"सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचं समजल्यानंतर माझ्याही मनात आत्महत्येचा विचार येऊ लागला होता.सिनेसृष्टीमध्ये बाहेरील आऊटसाइडर व्यक्तींना खूप त्रास दिला जातो. त्यांचा छळही केला जातो. सुशांत सिंह राजपूत आणि मलादेखील याचा अनुभव आला आहे. त्यामुळे माझ्याही मनात आत्महत्येचा विचार येत होता.", असं कंगना म्हणाली.
नेमकं काय आहे प्रकरण?
२०१६ मध्ये अभिनेता हृतिक रोशन याच्यासोबत वाद सुरु होता. त्यावेळी जावेद अख्तर यांनी तिला घरी बोलावलं आणि धमकी दिल्याचा आरोप कंगनाने केला होता. मात्र, जावेद अख्तर यांनी कंगनाचे हे आरोप फेटाळून लावले. कंगनाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी तिने जावेद अख्तर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधानं केली होती. मात्र, यात काहीही तथ्य नसून नाहक आपली बदनामी केली जात असल्याचं म्हणत जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला.