दिवसेंदिवर एकावर एक परखड मत मांडत कंगणा राणौत बॉलिवूडमध्ये सुरू असणा-या प्रकणांवर वाचा फोडत आहे. इंडस्ट्रीतून काही लोकांना तिचे विचार आणि मत पटत नसल्यामुळे तिच्यावर टीकाही करताना दिसत आहे.मात्र कंगणाला आता कसल्याच गोष्टीचा फरक पडत नाही. काही वेळांपूर्वीच तिने मुलांना योग्य शिक्षण देण्याची गरज असल्याचे म्हणत आमिर खानवर निशाणा साधला होता. आता पुन्हा कंगणा भडकली आहे. पुन्हा तिने बॉलिवूडचा गॉ़डफादर ओळखला जाणारा करण जोहरवर निशाणा साधला आहे.
सोशल मीडियावर तिने करण जोहरबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यांत ''माझी सरकारला विनंती आहे, करण जोहरला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा '' असे म्हटले आहे. करण यापूर्वीही बेजबाबदार वागला आहे .कसलेही भान न ठेवता एका आंतराष्ट्रीय व्यासपिठावर मला इंडस्ट्री सोडण्याचा सल्ला त्याने दिला होता. उरीवेळीही त्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. सुशांत सिंह राजपूतच्या मृ्त्युलाही करणच जबाबदार आहे. भारतीय सैन्यावर देशद्रोही सिनेमा बनवत चुकीचा संदेश पसरवण्याचा त्याने प्रयत्न केला होता.
करण जोहरची निर्मिती असलेला 'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल'’ या सिनेमाची घोषणा झाली अगदी तेव्हापासूनच तो वादात सापडला आहे. आता या सिनेमावर निवृत्त फ्लाइट लेफ्टनंट श्रीविद्या राजन यांनी भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. चित्रपटात चुकीची तथ्य दाखवण्यात आल्याचा दावा श्रीविद्या राजन यांनी केला आहे. श्रीविद्या या गुंजन सक्सेना यांच्या कोर्समेट होत्या. एअरफोर्स अकॅडमी आणि हॅलिकॉप्टर ट्रेनिंग स्कूलमध्ये गुंजन यांच्यासोबत त्यांनीसुद्धा प्रशिक्षण घेतले होते. फेसबुकबवर एक लांबलचक पोस्ट लिहून श्रीविद्या यांनी अनेक दावे केले आहेत.