देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. आतापर्यंत अनेकजणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड आणि कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण होत आहे. भारतातील वाढत्या महामारीला देशासोबत जगभरातील सर्व देशांच्या वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनेल्समध्ये दाखवले जात आहे. ज्यावर अभिनेत्री कंगना राणौतने आक्षेप नोंदवला आहे.
कंगना राणौतने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती आंतरराष्ट्रीय मीडिया आणि भारतातील विचारवंतांवर निशाणा साधताना दिसते आहे. या व्हिडीओत ती म्हणाली की, कोरोनाशिवाय बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्यांची मला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. कधी तुम्ही पाहिले आहे भारतात कोणती आपत्ती येते, संकट येते तेव्हा एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली जाते आणि सर्व देश एकत्र येतात.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, तिचा 'थलायवी' चित्रपट २३ एप्रिल रोजी रिलीज होणार होता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. हा चित्रपट तमिळनाडूच्या मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या जीवनावर आधारीत आहे. त्याचप्रमाणे 'तेजस' आणि 'धाकड' या सिनेमातही ती काम करत आहे.