Join us

कंगना राणौतने 'थलायवी'साठी वाढवले होते 20 किलो वजन, कमी करण्यासाठी करतेय 'या' गोष्टी

By गीतांजली | Published: October 14, 2020 12:14 PM

कंगनाने आपल्या ट्विटरवर थलायवीच्या सेटवरचे काही फोटो शेअर केले होते.

अभिनेत्री कंगना राणौत तिचा आगामी सिनेमा 'थलायवी'ला घेऊन चर्चेत आहे. अलीकडेच तिने 'थलायवी'चे एक शेड्यूलचे शूटिंग पूर्ण केले आहे. याची माहिती कंगनाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली होती. शूटिंग पूर्ण केल्यानंतर कंगना तिच्या हिमाचलच्या घरी परतली आहे. घरी परतल्यानंतर आता कंगनाने एक ट्विट करत सांगितले की. 'थलायवी'साठी तिने 20 किलो वजन वाढवले होते.आता ती ते कमी करतेय.   

कंगानाने ट्विटरवर योगा करतानाचा फोटो शेअर केला आहे. यात ती स्लिम दिसतेय. या फोटोला कॅप्शन देताना कंगानाने लिहिलेय, थलायवीसाठी मी 20 किलो वजन वाढवले होते. आता शूटिंग जवळपास पूर्ण होणार आहे. आता मला माझी आधीच लवकचिकता परत आणण्याची गरज आहे. सकाळी लवकर उठतेय आणि वॉक करायला जातेय. कोण-कोण माझ्यासोबत आहे ?' कंगना वजन कमी करण्यासाठी योगा आणि वॉकचा आधार येतोय. 

याआधी 11 ऑक्टोबरला कंगनाने आपल्या ट्विटरवर थलायवीच्या सेटवरचे काही फोटो शेअर केले होते.या फोटोंमध्ये कंगना तामिळनाडुच्या विधानसभेत बसलेली दाखवली आहे. कंगनाचा हा सिनेमा तामिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन एएल विजय करत आहे आणि याची स्क्रीप्ट बाहुबलीचे आणि मणिकर्णिकाचे लेखक केवी विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे.‘थलायवी’ हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

‘ते’ ट्विट पडले महागात, कंगना राणौतविरोधात कर्नाटकात गुन्हा

 

टॅग्स :कंगना राणौतथलायवी