Join us

कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, न्यायव्यवस्थेवर टीका; वकिलाने केली खासगी तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 8:53 AM

मुंबईचा उल्लेख ‘पाकव्याप्त काश्मीर’ असा करणाऱ्या कंगनाविरोधात वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार करण्यात आली. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कंगनाने केल्याचा आरोप करण्यात आला.

मुंबई : कनिष्ठ न्यायालयाने गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिल्यावर बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने न्यायव्यवस्थेवर टीका करणारे टिष्ट्वट केले. तिच्या या टिष्ट्वटविरोधात एका वकिलाने खासगी तक्रार केली आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मुंबईचा उल्लेख ‘पाकव्याप्त काश्मीर’ असा करणाऱ्या कंगनाविरोधात वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार करण्यात आली. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कंगनाने केल्याचा आरोप करण्यात आला. या तक्रारीनंतर दंडाधिकाऱ्यांनी कंगना व तिची बहीण रंगोलीविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिसांनी दोघींवर गुन्हा नोंदवीत समन्स बजावले. कंगना व तिच्या बहिणीला २६ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

त्यानंतर कंगनाने न्यायव्यवस्थेविरुद्ध द्वेषयुक्त आणि अवमानकारक टिष्ट्वट केले. ‘पप्पू सेना’ असा उल्लेख केला. या तक्रारीवर १० नोव्हेंबर रोजी अंधेरी न्यायालयात सुनावणी होईल. अली खाशीफ खान देशमुख यांनी कंगनाविरुद्ध तक्रार केली आहे. 

टॅग्स :कंगना राणौतवकिलन्यायालय